वडूज @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खटाव तालुक्यातील बुध,उंबरमळे, काटेवाडी या तीन गावांतील सार्वत्रिक तर विखळे व त्रिमली या दोन गावांतील पोट निवडणूकीची मतमोजणी तहसिलदार कार्यालयात पार पडली. बुध येथे सप्तरंगी लढतीत बाजी मारत अपक्ष उमेदवार अभय उदयसिंह राजेघाटगे यांनी सरपंचपदाच्या निवडणूकीत बहुमताने विजय मिळविला. उंबरमळे येथे स्वत: सरपंचपद जिंकत नवनाथ वलेकर यांनी सात पैकी सहा जागा जिंकत ग्रामपंचायतीवरील आपली पकड कायम ठेवली. तर काटेवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी प्रणित मानाप्पा पॅनेलने सरपंचपदासह सात पैकी सहा जागा जिंकत परिवर्तन घडविले आहे. विखळे येथील भाजपाप्रणित आघाडीने सहाही जागा पुनश्च जिंकत याठिकाणी भाजपाचे कमळ पुन्हा फुलविले आहे.
बुध येथे तेरा पैकी सात जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित सह्याद्री पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर विरोधी भाजपा आघाडी व काँग्रेस प्रणित पॅनेलला प्रत्येकी तीन जागांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी विजयी उमेदवारांत सह्याद्री पॅनेलचे योगेश दिलीप ठोंबरे (252 मते),समीर रज्जाक सय्यद (432 मते), गणेश कृष्णा सातपुते (428 मते), मनिषा सुधाकर कुंभार (472 मते), विजय दौलतराव खराटे (239 मते), दिपाली गणेश मेळावणे ( 234 मते), हे विजयी झाले. तर काँग्रेसप्रणित पॅनेलचे रंजना प्रकाश घाटगे (269 मते),श्वेता अशोक बोराटे (259 मते), लता महादेव सुर्यवंशी (227 मते), रेखा सतिश घाटगे (221 मते) हे उमेदवार विजयी झाले. तर भाजपाप्रणित पॅनेलचे पोपट संपत जाधव (352 मते), संगिता कुंडलीक जाधव (428 मते), शशिकांत शिवाजीराव घाटगे (191 मते)हे उमेदवार विजयी झाले. थेट सरपंचपदाच्या निवडणूकीत अपक्ष अभय घाटगे यांनी 1 हजार 213 मते मिळवीत विजय मिळविला.
उंबरमळे ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणूकीत नवनाथ अर्जुन वलेकर (339 मते) मिळवून मोठ्या फरकाने विजय मिळविला. त्यांच्याच नेतृत्वाखालील पॅनेलने नऊ पैकी आठ जागा जिंकत गावावरील आपली पकड कायम राखली.याठिकाणचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : मोहन मामा पाटोळे (117 मते), रेश्मा दादासाहेब वलेकर (118 मते), पोपट बाबुराव वलेकर (103 मते), ताईबाई किरण वलेकर (90 मते), सहदेव केशव वलेकर (130 मते), उर्मिला हिराचंद काळे (133 मते), शेवंता सोपान वलेकर (117 मते).
काटेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता कचरे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र कचरे, प्रा. भानुदास कोरडे, प्रकाश उर्फ दामोदर कचरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणित मानाप्पा पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार बाळासाहेब काकासाहेब जगदाळे हे 178 मते मिळवून विजयी झाले. याच पॅनेलने सात पैकी सहा जागा जिंकून ग्रामपंचायतीत परिवर्तन घडविले आहे. विजयी उमेदवारांत सुषमा राहूल कोरडे (79 मते), छाया मानसिंग घनवट (99 मते) तर विरोधी सावता माळी पॅनेलच्या मोनिका बाळासाहेब पांडेकर (75 मते), या एका जागेवर समाधान मानावे लागले. तर याठिकाणी मानाप्पा पॅनेलच्या चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
विखळे येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या सहा जागांच्या पोटनिवडणूकीत भाजप प्रणित आघाडीने सर्वच ठिकाणी विजय संपादन केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : राहूल प्रकाश देशमुख (291 मते), रेखा संतोष जाधव (318 मते), सखुबाई हणमंत घाडगे (314 मते), कविता पांडूरंग नामदास (239 मते), सचिन जगन्नाथ जंगम (240 मते), प्रसाद चांगदेव देशमुख (253 मते). तर त्रिमली येथील एका जागेच्या पोटनिवडणूकीत हणमंत मारूती गुरव यांनी 206 मते मिळवून विजय मिळविला.

0 Comments