Hot Posts

6/recent/ticker-posts

पाडेगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन


फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

पाडेगाव तालुका फलटण येथे शिवसेना शाखाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांतदादा जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गावातील तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तसेच महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी  शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांतदादा जाधव म्हणाले की, सर्व सामान्य माणसांची आवडती संघटणा म्हणजे शिवसेना असून शिवसेनेच्या कार्याला सर्व ग्रामीण भागातून शेतकरी वर्गातुन मान सन्मान असून गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक तयार करायचा आमचा संकल्प आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक यांनी तरुणांनी शिवसेने सोबत यावे व शिवसेनेचे काम करावे. छत्रपती. शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा हातात घ्या व जनतेची सेवा करा व फलटण तालुक्यात आम्ही भगवा झांजावत सुरू केला आहे तुम्ही त्याचे साक्षीदार नव्हे तर भागिदार व्हा असे आव्हान तरूणांना स्वप्निल मुळीक यांनी केले. यावेळी विठ्ठलराव गायकवाड, तालुका संघटक मधुसूदन कदम, राहुल देशमुख, प्रदीप झणझणे, हेमंत सुतार, युवराज रणवरे, सचिन बिडवे, विकास नाळे, राम सपकाळ, तुषार वाडकर, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments