Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवरायांचा चारित्र्य, कर्तुत्व व धाडसीपणाचा विचार आजच्या युवा पिढीने आचरणात आणायला हवा - श्रीमंत. संजीवराजे नाईक निंबाळकर



फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य, कर्तुत्व व आचरणामुळे त्यांची ओळख जगात आदर्श राजा म्हणुन झाली. छ. शिवाजी महाराज यांची कारकिर्द एक आदर्श राजव्यवस्था म्हणून पाहिली जाते, परंतु आज आपण त्यांच्या सारखे वागतो का ? याचे आत्मपरिक्षण आजच्या पिढीने करणे गरजेचे असून त्यांचे चारित्र्य व विचार आचरणात आणले तरच ख-र्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे आपण समजतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

विडणी ता.फलटण येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रंथालय व स्पर्धा परिक्षा अभ्यासिका वर्गाच्या लायब्ररीचे उदघाटन तसेच संभाजी बिग्रेडच्यावतीने शिवजयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते.

सध्या शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय वापर होत आहे त्याबद्दल राजकारण खंत व्यक्त करुन, महापुरुषांना ठराविक एका चौकटीत आणू नये असे आवाहन करुन संजीवराजे म्हणाले की, प्रतापगडावर देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आनावरण झाले. सदर पुतळ्याच्या निर्मितीत फलटण संस्थानचे अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे यांचा मोलाचा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराज महिलांना सन्मानाची वागणूक देत. राजमाता जिजाऊनी त्यांना घडविले त्यांच्या प्रशासनात सर्व जाती धर्माच्या घटकांचा समावेश होता. त्यामुळे ते आदर्श राज्यकर्ते होते. आजच्या पिढीनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायला नाही तर त्यांचे चारित्र्य, कर्तुत्व व धाडसीपणाचा विचारही आचरणात आणायला शिकावे असे आवाहनही युवा शक्तीला केले.

छोटा पुढारी (सिने अभिनेता) घनशाम दरोडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकरी वर्गाविषयी वेगळा अर्थसंकल्प सायचा. गोर गरिबांच्या मुला मुलींच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी देखील ते विशेष निधी देत असत. पण आत्ताचे शासन हे शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. शेतकर्याने जिवापाड कष्ट करून शेतात पिके आणायची आणि त्याच्या पिकाला मात्र काडीमोल भाव द्यायचा, यामुळे तो आर्थिक डबघाईला येऊन कर्जबाजारी झाला व तो आत्महत्या करु लागला आहे याची शासनाला जाणीव नाही. यासाठी शेतकऱ्याने शेतात स्वतःपुरते अन्न धान्य पिकवून शासनाला धडा शिकवावा. तसेच युवकांनी शिवजयंतीच्या निमित्ताने स्त्रीभ्रुण हत्या होऊ देणार नाही अशी शपथ घ्यावी असे आवाहनही घनशाम याने यावेळी केले.

या कार्यक्रमास फलटण पंचायत समितीचे उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, श्रीराम साखर कारखाना चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, संचालक जगन्नाथ बुवा नाळे, पं.स. सदस्या सौ.सुशिला नाळे, सरपंच सौ.रुपाली अभंग, रणजितसिंह भोसले, मंत्रालय कक्ष अधिकारी धिरज अभंग, छोटा पुढारी घनशाम दरवडे, मारुती नाळे, उद्योजक सचिन भोसले, सचिन ननावरे, राजीव पवार, पोलिस पाटील धनाजी नेरकर, चंद्रशेखर लाड, माझेरी (पुर्नवसन) च्या सरपंच सौ.सिताबाई दिघे, ज्ञानेश्वर दिघे, किसन दिघे, सुधीर अहिवळे, संभाजी ब्रिग्रेड जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. यावेळी खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविलेल्या प्रतिक्षा खुरंगे हिला शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन पवार व ज्ञानेश्वर दिघे यांनी केले तर आभार विशाल शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments