Hot Posts

6/recent/ticker-posts

काजल लोखंडेचा ढवळकरांकडून सत्कार

फलटण/ सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
कृषी महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या फेडरल बॅकेच्या कॅपस इंटरव्हू मध्ये ढवळ गावची कन्या काजल रोहीदास लोखंडे हिची  कृषी अधिकारी पदी निवड झाल्यामुळे समस्त ढवळ ग्रामस्थांनी तिच्या या यशाबद्दल नुकतेच सत्कार समारंभाचे आयोजन केले होते..

काजलने इयत्ता 1ली ते 12 वी शिक्षण नागपूर येथे  त्यानंतर कृषी विद्यापीठ राहूरी येथे बी.एस.सी अॅग्री आणि कोल्हापूर कृषी विद्यापीठ येथे एम.एस.सी अॅग्री शिक्षण घेत असताना तिची निवड झाली. कु काजल हीची घरची परिस्थीती अत्यंत हालाकीची असताना सुद्धा तीने या परिस्थीतीवर मात करीत हे यश संपादन केले.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण काळे सर यांनी केले. तसेच शंकरराव लोखंडे सर, प्रा. नवनाथ लोखंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आनंदा लोखंडे महाराज यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला सरपंच आप्पासाहेब लोखंडे, माजी सरपंच विष्णू लोखंडे, वाघेश्वर पतसंस्था चेअरमन  शंकरराव लोखंडे, माजी पंचायत समिती सभापती  मोहनराव लोखंडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष  शामराव लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा लोखंडे महाराज, नारायण काळे  प्रा नवनाथ लोखंडे सर, व्हा. चेअरमन हिदुराव लोखंडे,  सदस्य संजय लोखंडे, सदस्य किरण लोखंडे, सुशिक्षीत युवा नेतृत्व विजयकुमार लोखंडे, माजी सरपंच रामदास बनकर, राजाराम गार्डी आप्पा, बाळू शिंगाडे युवा नेते सचिन लोखंडे, धनगर सेवा संस्था जिल्हा अध्यक्ष सुहास गोफणे, तुषार लोखंडे, दत्तात्रय लोखंडे, अंकुश लोखंडे,ईश्वर जाधव, गणपत लोखंडे, नानासाहेब लोखंडे,शिंगाडे मामा, सुनिल लोखंडे, प्रकाश लोखंडे, अक्षय लोखंडे, चंद्रकांत तांबे, अंकुश तांबे, मिथुन लोखंडे, तसेच सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते

Post a Comment

0 Comments