फलटण / सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
सन 2018-19 या वित्तीय वर्षाचे 148,24,94,744/ रुपयाचे शिलकी बजेट सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर दिनांक 28 रोजी झालेल्या विशेष सभेत मंजूर केले. यामध्ये एकूण 17 विषय मंजुर करण्यात आले. दिनांक 28 रोजी झालेल्या सभेत काँग्रेसच्या नगर सेवकांनी अनेक विषयात विरोधाच्या समशेरी उपसल्यामुळे सत्ताधाऱ्यानी बऱ्याच विषयांत दुरुस्त्याकरत अंदाज पत्रकीय बजेट मंजूर केले.
फलटण नगरपालिकेच्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहात सन 2018-19 च्या वित्तीय वर्षाचे सुुधारीत बजेट स्थायी समितीच्या वतीने पालिकेच्या विशेष सभेत सादर करण्यात आले. यावेळी
सुरवातीला दिव्यांग कल्याणकारी योजना अंतर्गत 38,00,000/- रुपये रकमेची तरतूद मंजूर करण्यात आली, अग्नीशामक विभागात कर्मचारी वाढ, फायर हायड्रटच्या विस्तारासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जलशुद्धीकरण केंद्र येथील मोकळ्या जागेत सौर यंत्रणा बसवण्यासाठी प्रकल्प अहवाल 5 लाख रुपयाची व नगर परिषद इमारतीवर सौर यंत्रणा बसवण्यासाठी 1.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या इमारतीच्या सुरक्षततेसाठी सुरक्षा रक्षकांची तरतूद, जिम साहित्य खरेदीसाठी निधीची तरतूदीसह सांस्कृतिक भवनची भाडेवाढ व पाणीपट्टीमध्ये वाढ तसेच मालमत्ता हस्तातरण शुल्क लागू करून अल्पसंख्याक बहुल समाजासाठी 60 लाख व नळ कनेक्शनसाठी मीटर बसवण्याचा प्रस्ताव मांडत 148,24,94,744/ रुपयाचे आर्थिक अंदाज पत्रक बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले.
आर्थिक अंदाज पत्रकामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी मागील सन 2015-16 सन 2016-17 व सन 2017-18 या अशी 38,62,363/- रुपये रकमेची व सन 2018-19 या साठी 21,03,700/ रुपये अशी एकुण 59,66,063/ रुपये रकमेची तरतूद करण्यात आली आहे. अग्नीशामक विभागात एकूण 9 कर्मचारी वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला यामध्ये 7 प्रशिक्षित फायरमन व 2 वाहन चालक असे 9 कर्मचारी अतिरिक्त ठेका पध्दतीने घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सदर सभेत अग्निशमन विभागात कर्मचारी वर्ग अपुरा असल्याचे कारण देत अतिरीक्त ठेका पध्दतीने कर्मचारी घेण्यासाठीचा २० लाखांची तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असता. या विभागात दोन गाड्या आहेत त्यापैकी एक गाडी वापरात आहे तीच्यावर अतिरीक्त कर्मचारी कशाला ? शहराला आधुनिक सुविधांयुक्त असणा-या नविन गाडीची गरज आहे ती खरेदी करा मग कर्मचारी वाढ करा अस अनुप शहा यांनी निक्षुन सांगितल्याने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त गाडीसाठी प्रस्ताव तयार करु असे यावेळी नगराध्यक्षा नेवसे यांनी सांगितले.
शहरात ज्याठिकाणी अग्निशमन वाहन पोहचू शकत नाही तेथे फायर हायड्रंटच्या जाळ्याच्या विस्तारासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचे फायर ऑडिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातीलमोकळ्या जागेत सौर यंत्रणा बसवण्यासाठीच्या प्रकल्प अहवाल तयार करणेकमी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणेकमी 5 लाख रुपयाची करण्यात आली आहे.सध्या नगर परिषदे इमारतीचे वार्षिक 3,11,830/ रुपये वीज देयक येते यापुढे नगर परिषदेची जुनी इमारत वापरात येणार असून त्यामुळे वीज देयकात वाढ होणार आहे. शासनाच्या सौर योजनेच्या योजनेमधून नगर परिषदेच्या इमारतीवर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केल्यास नगर परिषदेचे वीज देयक कमी होईल याकरिता नाविन्यपूर्ण योजनेमधून किंवा इतर शासकीय निधीमधून 1 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या रोड लाईट वीज देयकासाठी सरासरी वार्षिक 60 लाख रुपये तसेच दुरुस्तीसाठी 11 लाख रुपये व साहित्य खरेदीसाठी 27 लाख रुपये असे एकूण 1 कोटी रुपये खर्च होत आहेत. सदरचे वीज देयक कमी करण्यासाठीच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्याकमी एजन्सी नेमणे कमी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात येत आहे असे सांगितल्यानंतर सदर फायर ऑडिट 2012 पासून ते आजअखेर करण्यात आले आहे का? असा प्रश्न विरोधकांनी केला असता मुख्याधिकारी यांनी आजअखेर फायर ऑडिट करण्यात आले नसल्याचे सांगितले व ती प्रशासनाची चुक असल्याचे मान्य केले.
नगर परिषदेच्या कार्यालयीन नवीन व जुनी इमारत, सांस्कृतिक भवन, जलशुद्धीकरण केंद्र, बाहुली शाळेशेजारील दवाखाना, जलतरण तलाव, पाण्याच्या टाक्या इत्यादी इमारतीच्या सुरक्षेसाठी 20 सुरक्षा कर्मचारी नेमणेकामी प्रति महिना 2,59,200/ रुपये व वार्षिक खर्च 40 लाख रुपये अदा करण्यासाठी
आठवडा बाजार मधून 20 लाख व घरपट्टी वसुलीमधून 10 लाख, राज्यशासनाच्या फेरीवाले धोरणामधून 10 लाख रुपये यामधून खर्च अदा करण्याची तरतूद मंजूर करण्यात आली. यावेळी जलतरण तलावाचा शुभारंभ सत्ताधाऱ्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केला असा आरोप करून हा स्विमिंग पूल आहेकी जनावरांना पोहायला केलेल डबकं ? असा संतप्त सवाल विरोधी पक्ष नेत्यांनी केल्यानंतर हा तलाव मार्च अखेर सुरू करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिले.
नगर परिषदेमध्ये झिरो पेडेन्सी व डेली डीसपोजल हा उपक्रम राबविण्याकरीत 20 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यांची तरतूद करण्यात आली आहे असा प्रस्ताव मांडताच मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडे माहिती मागणी अर्ज ढिगभर पडून आहेत परंतु आज तागायत कोणतीच माहिती देण्यात आली नाही, नगरसेवकाची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्याची काय अवस्था असेल असा प्रश्न यावेळी नगर सेवक अनुप शहा व सचिन अहिवळे यांनी केला. झिरो पेडेन्सीचे गाजर दाखवण्या आगोदर सर्व प्रथम प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणा अशी मागणीही यावेळी दोघांनी केली.
नगर परिषदेकडील शहरातील असलेल्या व्यायाम शाळेच्या साहित्य खरेदीसाठी प्रत्येक रक्कम रुपये 5 लाखाची तरतूद करण्यात आली आहे असा प्रस्ताव मांडताच नगरसेविका वैशाली अहिवळे, अनुप शहा, अजय माळवे यांनीही आपल्या भागातील व्यामशाळांसाठी निधीची मागणी केली. तेव्हा नगराध्यक्षा नेवसे यांनी ती मागणी मान्य करून तशी तरतूद करण्यात येईल असे सांगितले.
इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनसाठी येणारे लाईट बिल, देखभाल दुरुस्ती खर्च याकरीता भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये लग्नसमारंभ याकरिता 15000 रुपये भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला यास विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी मोठा विरोध केला. 3600 रुपयांवरून थेट 15000 रुपये ही दर वाढ अन्यायकारक आहे. दरात वाढ कसली करताय आगोदर चांगली सेवा द्या अशी जोरदार मागणी केली. तेव्हा 15000 रुपयांवरून ही दर वाढ 7000 रुपये असेल असे नगराध्यक्षानी सांगितले.
नगर परिषद हद्दीतील मिळकतीचे विक्री व्यवहार व वारसांची नोंद करणेकामी होणाऱ्या व्यवहारात 0.1 टक्के दराने आकारणी करण्यासंदर्भात ठराव मांडण्यात आला यास प्रखर विरोध दर्शवताना समशेरसिंह म्हणाले हा हस्तांतरण कर नसून झिझिया कर आहे व त्यास आमचा पूर्ण विरोध आहे असे सांगताचसर्वानुमते हस्तांतर नोंदणी फी १०० रुपये घेण्याचे ठरविण्यात आले.
फलटण नगर परिषद मालकीच्या रस्त्यालगतच्या जागा नगर परिषदेने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत सध्या 200 हातगाडी धारकाकडून 14,60,000/ वसूल होत आहे त्या तुलनेत भुईभाडे करू यांच्याकडून भांड्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे म्हणून शासकीय दर सूची नुसार या सर्व जागेच्या मूल्यावर 12 टक्के आकारणी व त्यावर 0.15 टक्के सेवाशुल्क यातून येणारी रक्कम दरमहा भाडे व त्यानुसार संकलित कर व आकारणी करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील 9 हजार नळ जोडण्याना मीटर बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सदर मीटर बसवल्यास 20 टक्के पाण्याची बचत होणार आहे याबाबतचा प्रस्ताव मांडला असता विरोधकांनी यास विरोध केला व त्यानंतर चर्चेअंती प्रायोगिक तत्वावर नळ मीटर बसवण्याचा निर्णय झाला सदरचा प्रोजेक्ट प्रायोगिक तत्वावर प्रभाग 12 मध्ये राबविण्याची मागणी केली केल्यानंतर ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली.
शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण करणे, पाणीपुरवठा दुरुस्ती खर्च व कर्मचारी वर्ग याचा विचार करता पाणीपुरवठा विभागाकडील खर्चाची तूट भरून येणे गरजेचे असल्याने पाणी पट्टी दरात वाढ करण्याचे गरजेचे असल्याने 1/2 इंची घरगुती नळ कनेक्शनला पूर्वी 1800 रुपये पाणीपट्टी व डिपॉझिट 1500 रुपये होते त्यामध्ये वाढ करून पाणीपट्टी 2000 रूपये व डिपॉझिट 2000 रुपये करण्यात आली, 3/4 इंची घरगुती नळ कनेक्शनमध्ये वाढ करून पाणीपट्टी 3500 रूपये व डिपॉझिट 2000 रुपये करण्यात आली, 1 इंची घरगुती नळ कनेक्शन पाणीपट्टीमध्ये वाढ करून पाणीपट्टी 6700 रूपये व डिपॉझिट 2000 रुपये वाढ करण्यात आली. 1/2 इंची व्यवसायिक नळ कनेक्शनला पूर्वी 5500 रुपये पाणीपट्टी व डिपॉझिट 5500 रुपये होते त्यामध्ये वाढ करून पाणीपट्टी 6500 रूपये व डिपॉझिट 6500 रुपये करण्यात आली, 3/4 इंची व्यवसायिक नळ कनेक्शनमध्ये वाढ करून पाणीपट्टी 11000 रूपये व डिपॉझिट 6500 रुपये करण्यात आली, 1 इंची व्यवसायिक नळ कनेक्शन पाणीपट्टीमध्ये वाढ करून पाणीपट्टी 22000 रूपये व डिपॉझिट 6500 रुपये वाढ करण्यात आली. तसेच घरगुती वापराच्या पाणी टँकरसाठी 700 रुपये व व्यावसायिकसाठी 1200 रुपये वाढ करण्यात आली आहे.
नगर परिषद हद्दीतील सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांन या योजनेमधून भूसंपादन करणेकामी 2 कोटी रुपये रकमेची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. अल्पसंख्याक बहुल समाजासाठी सुधारणा कार्यक्रमामधून ईदगाह मैदानाभोवती वॉल कम्पाउंड बांधनेकमी 20 लाख रुपये, अल्पसंख्याक भागामध्येमलनिस्सारण, जलनिस्सारण व गटर दुरुस्तीसाठी 20 लाख रुपये, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता उर्दू शाळा बांधण्याकरिता 10 लाख व जैन समाजाच्या विकासकामांसाठी 10 लाख रुपये अशी एकूण 60 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.
वरील सर्व विषयाचे वाचन नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांनी केले
0 Comments