फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
अरिहंत टी.व्ही.एस या दुचाकी नवीन शोरुमचा शुभारंभ फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे चेअरमन व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर आणि टी.व्ही.एस मोटार कंपनीचे जनरल मॅनेजर (सेल्स) ए. राजकुमार आदी मान्यवरांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून या नवीन शोरुमचे उद्घाटन समारंभ फलटण- लोणंद रोडवर जिंतीनाक्यानजीक पार पडला.
अरिहंत टी.व्ही.एस या दुचाकी शोरुमच्या माध्यमातून सध्या फलटण तालुक्यासह खंडाळा, माळशिरस, माण, खटाव या तालुक्यात एकूण 9 शोरुमद्वारे टी.व्ही.एस कंपनीच्या दुचाकींची विक्री व विक्री पश्चात उत्कृष्ट सेवा ग्राहकांना दिली जात असून आजच्या शोरुमचे उद्घाटन समारंभावेळी एनट्रॉक्स व अपाची आर.आर.310 या नवीन दोन गाड्याच्या मॉडेलचे प्रमुख मान्यवरांचे हस्ते लाँचीग करण्यात आले.
मंगेशशेठ दोशी यांनी शोरुमचा शुभारंभवेळी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात सांगितले की, आपण सन 1984 मध्ये या व्यवसायात पदार्पण केले त्यानंतर सन 1989 मध्ये टी.व्ही.एस कंपनीची डिलरशीप मिळाली त्यावेळी दुचाकी वाहनांची विक्री अत्यल्प होती मात्र ग्राहकांचा विश्वास, टि.व्ही.एस कंपनीच्या दुचाकींची ग्राहकांना असलेली आवड आणि कंपनीने नेहमी दर्जेदार उत्पादन देण्याला दिलेेले प्राधान्य यामुळे आज आपण दरमहा सुमारे 350 गाड्यांची विक्री करीत असून ग्राहकांनी कंपनीवर विश्वास दाखविला याची ही पोहोच पावती असल्याचे स्पष्ट केले.
आपला हा व्यवसाय सांभाळतानाच परंपरागत शेती आणि लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप या संस्था संघटनांच्या माध्यमातून सामाजिक काम करताना खूपच अनुभव मिळाले तसेच धार्मिक क्षेत्रातही आपण अनेक कामे केल्याचे नमूद करीत त्यामुळे कुटुंबाकडे पुरेसा वेळ देता आला नाही. मात्रसौभाग्यवती सौ. पूजा यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना मुलांनाही उत्तम प्रकारे घडविले मुलगा चि. सिध्दांत लंडनच्या वार्विक विद्यापीठाचा एम.बी.ए असून कन्या कु राधिका इंटेरिअर डिझायनर आहे. सर्वांच्या सहकार्याने व्यवसाय वाढविता आला. त्यामुळे कंपनीचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालो आता हा व्यवसाय चि. सिध्दांतकडे सोपवित असल्याची घोषणा यावेळी मंगेशशेठ दोशी यांनी केली. हरिभाऊ लोणकर यांनी सुत्रसंचालन व शेवटी सिध्दांत दोशी यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला व आभार मानले.
या कार्यक्रमास टी.व्ही.एसचे नेटवर्क मॅनेजर संतोषकुमार, आर टी ओ इन्स्पेक्टर संभाजीराव गावडे, टी.एम (सर्व्हीस) प्रविण जगताप, स्वयंसिध्दा महिला संस्था समुहाच्या प्रमुख व नगरसेविका अॅड. सौ. मधुबाला भोसले, बोरावके अॅटोलाइन्स हिरो शोरुमच्या प्रमुख श्रीमती रुपालीताई बोरावके,बोरावके होंडा शोरुमचे हेमंत बोरावके, सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, अनुप शहा, क्रेडाईचे फलटण शाखा प्रमुख महेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच बरोबर टी.व्ही.एस कंपनीचे अधिकारी, शहरातील विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांचे वितरक अरिहंत टी.व्ही.एसच्या 9 शाखांमधील प्रमुख, इतर कर्मचारी, लायन्स आणि जैन सोशल ग्रुपचे पदाधिकारी, सभासद, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, मंगेशशेठ दोशी यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments