फलटण/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क :- दरपत्रकातील पगारापेक्षा कमी रक्कम व प्रॉव्हीडट फंडात रक्कम भरणेचे सांगुन फलटण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात काम करणार्या 16 कर्मचार्यांची 25 लाखाची फसवणुक करणार्या खाजगी कॉन्ट्रॅकटर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत फलटण शहर पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार, दिनांक 1/3/2016 ते 28/2/2018 पर्यत रोहित प्रदिप सांळुखे राहणार- सोळशी तालुका कोरेगाव, दिनेश दत्तात्रय मुळीक राहणार- सासकल तालुका- फलटण, अंजिक्य अर्जुन गोळे राहणार- कुरवली खु तालुका-फलटण, रणजित दिलीप जाधव, प्रमोद विजय अहिवळे, तेजस राजाराम गुजले, प्रदिप रघुनाथ शिंदे, अमित अशोक अवघडे, सौरभ राजेंद्र मोहिते, लहु रामस्वमी जाधव, ज्ञानेश्वर सुखदेव जाधव, गणेश शामराव खुडे, योगेश बबनराव आडके, नवनाथ धनंजय चोरमले, निलेश दत्तात्रय अहिवळे सर्व राहणार-फलटण हे कामगार कॉन्ट्रॅकटर विराज केशव भोसले रा.प्लॅट नं 17 शंभुराज हाईटस् संजीवराजे नगर फलटण यांच्या राधीका प्लेसमेंट सर्विसेस या नावाचे टेंडरद्वारे कंत्राटी कामगार म्हणुन यांचेकडे काम करीत होते वरील कर्मचारी यांना 5 हजार ते 5 हजार 500 रूपये पगार दिला जात होता वरील कर्मचारी यांनी त्यांच्या पगारा बाबत व इतर हक्क बाबत फलटण नगर पालीका फलटण येथील कर्मचारी विनोद अशोक जाधव यांच्याकडे चौकशी केली असता प्रत्यक्षात 10 हजार ते 12 हजार पगार दरसुची पत्रका प्रमाणे असताना कॉन्ट्रॅकटर विराज भोसले हे जोे तुम्हाला पगार देत आहे तो बरोबर आहे असे सांगितले. कॉन्ट्रॅकटर सदर कर्मचार्याकडुन दर महिन्याला प्रॉव्हिडन्ट फंडाची रक्कम कोल्हापुर येथे भरावयाची आहे असे सांगुन प्रत्येकाकडुन 1 हजार रूपये घेत होता या बाबत वरील सर्व कर्मचार्याकडून मुळ आधार व पॅनकार्ड घेतली होती. वरील सर्व कर्मचारांनी प्रॉव्हिडन्ट फंडाबाबत 1 महीन्यापुर्वी कोल्हापुर ऑफीसला चौकशी केली असता 14 महीन्याची रक्कम तेथे जमा झाली आहे तसेच भोसले यांनी आम्हाला दर महीना 7 ते 8 हजार पगार असल्याचे दर्शविले आहे.तरी भोसले यांनी आमची सुमारे अंदाजे 25 लाख रुपयांची फसवणुक केली आहे.या बाबतची फिर्याद मंगेश मधुकर माने यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या बाबतचा तपास पोलिस हवालदार काकडे करीत आहेत.
0 Comments