पाटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मराठा क्रांती मोर्चा म्हणजे शांततेच्या मार्गाने आलेली नवीन क्रांती आहे. या क्रांतीने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला एकतेचा मार्ग दाखविला. शांततेच्या मार्गाने झालेले मोर्चे मराठा समाजाला चांगली दिशा देणारे ठरले. याचे फल्लीत सुप्रीम कोर्टाने अट्रासिटी कायद्यात केलेले योग्य बदल. याचे स्वागत मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका च्या वतीने करण्यात आले. याच वेळी या कायद्याच्या बदलाला ज्या राजकीय मराठा नेत्यांनी विरोध दर्शविला त्यांचा जाहीर निषेध हि यावेळी करण्यात आला. मराठा विरोधी राजकीय नेत्यांच्या पक्षाला येथून पुढे येणा-या निवडणुकीत धडा शिकवूया यासाठी राजकीय स्वार्थ न पहाणा-या मराठा मतदारांनी जागृती करा असा निर्णय सर्वानुमते या बैठकीत घेण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुकाच्या वतीने मेडिकल भवन पाटण येथे बैठक घेण्यात आली. यावेळी प्रतेक गावागावात मराठा भवन होण्याची मागणी करण्यात आली. प्रत्येक गावात मराठा बाल संस्कार मंदिर, विद्यार्थी- विद्यार्थ्यींनी मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणे तसेच मराठा समाजाची तालुका कमेटी नेमणे अशा काही निर्णयावर एक मत होऊन ठराव घेण्यात आले. अँड. राजेंद्र पाटणकर यांनी सुप्रिम कोर्टाने अट्रासिटी कायद्या संदर्भात केलेले नवीन बदल आणि अट्रासिटी कायदा या विषयी विस्तृत माहिती दिली. तर यशवंतराव जगताप, प्रा. अनिल मोहिते, प्रा. मनोहर यादव, सुरेश पाटील, राजाभाऊ काळे, चंद्रहार निकम, राजेंद्र पाटणकर, गोरख नारकर, सुभाष शिर्के, गणेश जाधव, आदींनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी श्रीनिवास पाटील नाडे, धनाजी केंडे अडुळ, मंगेश पाटणकर, शंकर मोहिते पाटण, सुरेश संकपाळ सुरुल, प्रविण जाधव पाटण, नितीन सत्रे आडुळ, जयवंत सुर्वे मोरगिरी, शिवाजी कोळेकर कोकिसरे, विश्वास मोहिते, संजय साबळे पाटण, महेश पवार केरळ, विष्णू पवार जळव, अनिल भोसले, बापु टोळे पाटण, निलेश सांळुखे येराड, महादेव पवार वाटोळे, विनोद सावंत धावडे, सुरेश यादव केर, संतोष इंदुलकर, संतोष कवडे पाटण, दिपक मांडवकर तामकणे, आदी शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. शेवटी आभार मानताना लक्ष्मण चव्हाण म्हणाले मराठा समाजाने केवळ एवढ्यावर गप्प न बसता कोणतेही राजकारण न करता समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. तरच मराठा समाजाचा सर्वांगीण विकास होईल.

0 Comments