Ticker

6/recent/ticker-posts

फलटण येथे एका वयोवृद्ध महिलेस एसटीने चिरडले

फलटण/ सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क :- आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोदाबाई अर्जुन कांबळे वय 70 राहणार आसू या वृद्ध महिलेच्या उजव्या पायावरून फलटण एसटी स्टॅन्डमधून बाहेर पडणारी एसटी क्रमांक mh-20-bl-3249 या गाडीचे मागचे चाक गेल्यामुळे उजव्या पायास फार गंभीर जखमी झाली आहे. उजवा पाय चाकाखाली सापडल्यामुळे गुडघ्या खाली पूर्ण मोडला आहे. या वृद्ध महिलेस फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फलटण शहरात वाढते अतिक्रमण व अतिक्रमण काढण्यास कुचकामी ठरत असणारी शासकीय यंत्रणा यामुळे शहरात अपघाताचे वाढतच असून किती बळी गेल्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न होणार हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

Post a Comment

0 Comments