Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण येथील पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट BREAKING

फलटण / सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
फलटण येथील एसटी स्टँड समोरील असणाऱ्या पेट्रोल पंपावर एक दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल भरताना वाहनाने अचानक पेट घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनि वेळीस प्रसंगावधान दाखवत गाडीवर त्वरित अग्निशमन यंत्राने फवारणी केल्यामुळे आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पेट्रोल पंपावर दुचाकी वाहन पटल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली होती.

शहरातील एसटी स्टँड समोर असणाऱ्या दोशी यांच्या पेट्रोलपंपावर आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास एक सीडी 100 हिरो होंडा दुचाकी पेट्रोल भरण्यास आली होती, त्यामध्ये पेट्रोल भरत असताना, अचानक गाडीने पेट घेतला व आगीचा भडका उडाला, पेट्रोल पंप कर्मचारी औदुंबर व त्यांच्या सहकार्यानी त्वरित पंपावर असलेल्या अग्निशमन यंत्राद्वारे आग विजवली व पुढील होणारा मोठा अनर्थ टाळला.

Post a Comment

0 Comments