Ticker

6/recent/ticker-posts

कुकुडवाडला जावयाने सासूला भोसकले


म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
घटस्फोट देण्याच्या कारणावरून नवरा-बायकोच्या भांडणात मध्येच बोलणार्‍या सासूवर आणि आपल्या पत्नीवर एकाने तलवार हल्ला केला. या हल्ल्यात सासूचा मृत्यू झाला. ही घटना माण तालुक्यातील कुकुडवाड येेथील शिवाजीनगरमध्ये घडली. खुन करून पळून गेलेला आरोपी आबासाहेब बबन काटकर (वय 40, रा. नरवणे, ता. माण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रंजना हणमंत भोसले (वय 55, रा. शिवाजीनगर, कुकुडवाड), असे मृत सासूचे नाव आहे. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वैशाली आबासाहेब काटकर यांच्यावर म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. 

Post a Comment

0 Comments