Ticker

6/recent/ticker-posts

भा ज पा मध्ये स्वीकृत साठी ' तडजोडी '


सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सातारा नगरपालिकेत भा ज पा चा एक स्वीकृत नगरसेवक आहे , सध्या ऍड खामकर या जागेवर नगरसेवक म्हणून होते , सार्वजनिक बांधकाम मंत्री ना चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरवातीलाच सांगितलं होतं की ज्यांनी   नगरपालिका  निवडणूक लढवली   आहे त्यांना स्वीकृत साठी संधी मिळणार नाही तसेच पाच वर्षात पाच जणांना जे पक्षासाठी काम करतात आशाना स्वीकृत साठी संधी देण्यात येईल, हा आदेश प्रमाण मानून   जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सुद्धा काम करणार्यालाच संधी देण्यात येईल असे सांगून त्या दृष्टीने कामास सुरवात केली ,त्या प्रमाणे एक वर्ष पूर्ण झाल्यावर ऍड खामकर यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा सादर केला , साताऱ्यातील काही नेत्यांकडून संघटनेत काम करणाऱ्या चारच पदाधिकाऱ्यांची नावे  पुढे पाठवली आहेत असे समजते , परंतु कुणाच्या तरी हट्टामुळे  आता काम करणारे , बैठकांना हजर राहणारे आणि पक्ष सांगेल ती कामे करणारे , पक्ष विस्तार योजना घरोघरी पोचवणारे कार्यकर्ते, पदाधिकारी डावलले जात असून कोणाच्या तरी बगलबच्याना  तडजोड करून स्वीकृत नगरसेवक करण्याचा घाट घातला जात आहे अशी चर्चा भा ज पा कार्यकर्त्यांत जोर धरत आहे , यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे , सर्वसामान्य कार्यकर्त्यांत या गोष्टींची चर्चा वाढीस लागली आहे

Post a Comment

0 Comments