Hot Posts

6/recent/ticker-posts

दहिवडी, मायणीत वाळू वाहतुकीवर कारवाई



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

दहिवडी: माणचे प्रांताधिकारी   दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने रविवारी रात्री दहिवडी व मायणी येथे छापा टाकून विना परवाना वाळू उपसा करणार्‍या पाच वाहनांवर कारवाई  केली. 


दाहिवडी येथील तुपेवाडी परिसरात वाळूचे अवैध उत्खनन सुरु असल्याची असल्याची माहिती मिळाल्यानंतर कांबळे यांनी पथकासह जाऊन एका ट्रॅक्टरवर कारवाई केली.  दुसर्‍या कारवाईत मायणी अभयारण्यात उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच उत्खनन करून वाहतूक  करताना पिकअप क्रमांक एमएच 10, एक्यू 0657 व पिकअप क्रमांक एमएच 12 जेएफ  5256  व एक विनानंबर अशोक लेलँड कंपनीच पिक-अप तसेच मायणी येथील संतोष ढवळे यांच्या मालकीचे पिक-अप अशा चार वाहनांवर कारवाई करण्यात आली.



या कारवाईत प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तलाठी संतोष ढोले, गणेश बोबडे, रवी शिंदे, तुषार पोळ, महेश शिंदे, प्रशांत कोळी हे भरारी पथकातील कर्मचारी तर मायणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, कॉन्स्टेबल खाडे, दोलताडे सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments