Hot Posts

6/recent/ticker-posts

मलकापूर नगरपंचायतीत आत्तार दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, नळकनेक्शन तोडल्याचे कारण, नगरपंचायतीने बजावली होती नोटीस, नागरिकांचे प्रसंगावधानामुळे अनर्थ टाळला

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

कराड :   मलकापूर नगरपंचायतीने नळकनेक्शनतोडल्याच्या कारणावरून मलकापुरातील  दाम्पत्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्नकेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार अचानक घडलेल्यामुळे नगरपंचायतीतील अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सदर घटना ही मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. अंगावर रॉकेल ओतून काडी पेटवण्यापुर्वीच उपस्थितांनी दाम्पत्याला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच हा प्रकार घडल्याने या घटनेची फिर्यादी स्व:त मुख्याधिकाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली असून त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,राजासाब दस्तगीर आत्तार रा. मलकापूर यांच्या घराच्या बाथरूमचे सांडपाणी शेजारील मिळकतदाराच्या जागेत जात होते. त्या मिळकतदार व त्यांच्या कुटुंबियांना आत्तार यांच्या बाथरूमच्या सांडपाण्याचा त्रास होत होता. त्यामुळे शेजारील मिळकतदाराने मलकापूर नगरपंचायतीत आत्तार यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी संजीवनी दळवी व पदाधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबियांना एकत्रितपणे बोलून परस्परविरोधी तक्रारी ऐकून घेतल्या. चर्चेअंती नगरपंचायत प्रशासनाकडून बाथरूमच्या सांडपाण्याचा त्वरित बंदोबस्त करण्याचे आत्तार यांना बजावण्यात आले होते. शिवाय त्या अर्थाची नोटीसही नगरपंचायतीने आत्तार यांना दिली होती. मात्र आत्तार कुटुंबीयांनी सांडपाण्याचा बंदोबस्त केला नसल्याने कारवाई करण्यासाठी नगरपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या आत्तारदाम्पत्याने नगरपंचायतीत येऊन आत्मदहन  करण्याचा प्रयत्न केला.


सोमवारी दुपारी साडेबारारस हा प्रकार घडला. यावेळी राजासाब आत्तार हातात रॉकेल भरलेला कॅन घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिरले. त्यांनी नळकनेक्शन तोडून नगरपंचायतीने केलेल्या कारवाई बाबत मुख्याधिकारी संजीवली दळवींना विचारणा केली. व आधीच संतापलेल्या आतार यांनी हातातील रॉकेलचा कॅन अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नगरपंचायतीतील अधिकारी, कर्मचाऱयांसह कामानिमित्ताने नगरपंचायतीत आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. . हा प्रकार समजताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार पन्हाळे, हवालदार बैले यांच्यासह कर्मचारी तात्काळ दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनेची माहिती घेतली. दरम्यान आत्तार यांच्यावर शहरपोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.



Post a Comment

0 Comments