वाठार स्टेशन : दोन दिवसांपूर्वी सालपे घाटात झालेल्या ट्रक चालकाला मारहाण करून लुटण्यात आलेल्या दरोडेखोरांना वाठार स्टेशन पोलिसांनी सापळा रचून अखेर जेरबंद केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सालपे घाटात शुक्रवारी पहाटे 5.15 ला हरियाणा येथील ट्रक चालकास व क्लिनर यांना मारहाण करून लुटले होते. या बद्दल ट्रक चालक शरीफ खान व क्लिनर अलिम खान यांनी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपासादरम्यान स.पो.नि.मारुती खेडकर व यांच्या टीमला घटनास्थळी दरोडेखोरांची मोटरसायकल आढळून आली त्या मोटरसायकलच्या क्रमांकावरून दरोड्यातील चार आरोपीना वाठार पोलिसांनी सापळा रचून जेरबंद करण्यात यश मिळवले.
या आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी सोपान हिरालाल सरक वय 23 रा.मिरगाव ता.फलटण, अमोल नामदेव सोनवलकर वय 24 रा. मिरगाव ता.फलटण, संतोष संजय बुधावले वय 21 रा. रामोशीवाडी ता.कोरेगाव, रोहित शंकर जाधव वय 21 रा.चिंचणी ता. खटाव असे आहेत या दरोडेखोरांनी लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वाहन चालकांना मारहाण करून लुटल्याचे उघड झाले आहे. या आरोपींच्या बरोबर इतर काही साथीदार असण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने वाठार स्टेशन पोलिसांचा तपास सुरू आहे. या दरोडेखोरांनी अजून कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते गुन्हे केलेले आहेत याचाही तपास स.पो.नि.मारुती खेडकर व टीम करीत आहे.
या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक मा. संदीप पाटील, मा.अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, मा.उप विभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.मारुती खेडकर व यांच्या टीमने केले.

0 Comments