Hot Posts

6/recent/ticker-posts

हरि नामाच्या गजरात रंगला चांदोबाचा लिंबमध्ये माऊलींचा रिंगण सोहळा (पहा व्हिडिओ)




फलटण /विक्रम चोरमले :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग...माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड...दिंडीतील वारकर्‍यांच्या पायांनी धरलेला ठेका...टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन्  हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवरचा पहीला उभ्या  रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा 'चांदोबाचा लिंब' येथे उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments