Hot Posts

6/recent/ticker-posts

प्राथमिक शिक्षक लिखित "हाफहंडी" ह्या लघुचिञपटाचे चिञिकरण लवकरच सूरु होणार शाळाबाह्य मुलाच्या जीवनावर आधारीत लघुपट




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सांगोला : जिल्हा परीषद प्राथमिक शाळा निकम/कोपे वस्ती ता.मंगळवेढा जि.सोलापूर येथील तंञस्नेही शिक्षक श्री.नागेशकूमार धनवे यांनी शिक्षण क्षेञातून बाहेर चाललेली मुले म्हणजे शाळाबाह्य मुले हा ज्वलंत विषय डोळ्यापुढे ठेऊन या लघुचिञपटाचे स्क्रिप्ट लिहले आहे.
सदर स्क्रिप्ट लिहण्यासाठी त्यांना तीन ते चार महिण्याचा कालावधी लागला.
या लघुचिञपटाची थिम त्यांना  एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बाल कामगारास पाहून सुचली.एका शाळेत न येणाऱ्या मुलास शिक्षण प्रवाहात कसे आणले?तो शेवटपर्यंत शाळेत टिकला का?त्याला कोणत्या अडचणी आल्या.? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे चिञपट पाहील्यानंतरच समजतीलच.अशा या सामाजिक लघुचिञपटाचे चिञिकरण लवकरच म्हणजे घृपावसाळ्यानंतर सूरु करण्यात येणार असल्याचे धनवे यांनी सांगितले.
या लघुचिञपटाचे चिञिकरण सांगोला,सांगोला ते मंगळवेढा रस्ता,ओझेवाडी,पंढरपूर ता.पंढरपूर ,बोराळे ता.मंगळवेढा येथे करणार असल्याचे निश्चित करण्यात आले असून सदर चिञपटासाठी आणखी काही सुयोग्य ठिकाणे व व्यक्तीपाञे असल्यास कळवण्याचे अहवान ही श्री.नागेशकूमार धनवे (८८८८७७६६९२ )यांनी केलेले आहे.

Post a Comment

0 Comments