सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
मलकापूर :- कराड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत शहरातील पदाधिकारी व नागरिकांनी खड्डेयुक्त रस्त्यावर वृक्षारोपण करुन अभिनव आंदोलन आज केले.
यावेळी जेष्ठ नेते कृषीमिञ अशोकरावजी थोरात, हणमंतराव जाधव, नगरसेविका मनिषा लाखे, बाळासाहेब घाडगे , सागर निकम, माजी नगराध्यक्ष आबासो गावडे, सुधाकर शिंदे, तानाजीराव देशमुख, सुरज शेवाळे, आबासो सोळवंडे, भिमाशंकर माऊर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अशोकराव थोरात म्हणाले कि मलकापूर नगरपंचायतीने गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण केले. परंतू सदरचे रस्ते हे एक दोन महिन्यातच उखडलेले आढळून आलेले आहेत. काही रस्ते खचले आहेत.तर काही ठिकाणी मोठ मोठे खड्डेच पडले आहेत. रस्ते कामांमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.रस्त्यांची कामे ही सत्ताधारी काॅग्रेस मंडळींचे बगल बच्चेच असल्याने भोंगळपध्दतीने कामे करण्यात आली.मलकापूरची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती यांनी गडबडीत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.तर काही रस्ते पावसामध्ये देखील करण्यात आले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असुन मलकापूरची जनता ही सुज्ञ आहे तुमच्या तुम्ही केलेल्या कांमांपासुन अनभिज्ञ नाही. त्यामुळे सर्व सामांन्य जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक यापुढे खपवून घेतली जाणार नाही. आम्ही सदरच्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत निषेध करण्यासाठी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचे दि.१७/०७/२०१८ रोजी नगरपंचायतीस पञ दिले आहे नगरपंचायतीने सदर पञाची साधी दखल घेवून आम्हाला काय कार्यवाही करत आहात हे देखील कळवलेले नाही. नगरपंचायतीच्या परवाच्या सर्वसाधारण सभेमध्ये आपण नविनच केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे मान्य केले. त्यामुळे बांधकाम सभापती व उपनगराध्यक्ष यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे यावेळी थोरात म्हणाले. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांसह लोकप्रतिनिधी आजी माजी नगरसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments