कराड-चिपळूण महामार्गावर दास्तान टोलनाका येथे रस्तारोको - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, August 7, 2018

कराड-चिपळूण महामार्गावर दास्तान टोलनाका येथे रस्तारोको

पाटण :  मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी कोयनानगर विभागातील सकल मराठा समाजातील बांधवांनी आक्रमक होऊन  कोयना नगर येथील जुना मार्केट येथे एकत्र येऊन आपला मोर्चा दास्तान टोलनाका येथे वळविला. कराड-चिपळूण महामार्गावर दास्तान टोलनाका येथे  रस्तारोको करुन संघटितपणे  जेलभरो आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध केला. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.


कोयनानगर विभागातील दास्तान येथील टोलनाका परिसरात कराड-चिपळूण महामार्गावर एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत कोयना विभागातील सकल मराठा समाजातील बांधवांनी रस्तारोको करुन शासनाचा निषेध व्यक्त केला जेलभरो आंदोलन केले. यावेळी अनेक आंदोलकांनी स्वतःला अटक करुन घेतली. दरम्यान, रविवार हा कोयनानगरचा आठवडा बाजार असल्याने पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली होती.


रास्तारोको आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार वा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल गुजर यांनी  चोख पोलीस बंदोबस्त ठेवला  होता.

No comments:

Post a Comment