शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध : आ.श्री.बाळासाहेब पाटील - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, August 7, 2018

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध : आ.श्री.बाळासाहेब पाटील


  
तुषार माने / म्हासुर्णे  :म्हासुर्णे: स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली त्याची संपूर्ण जबाबदारी स्वर्गीय पि.डी.पाटील साहेबांचे वरती त्यांनी सोपवली व त्यांनीसुद्धा ती अतिशय कुशलतेने शेतकरी हितासाठी जोपासना केली व त्याच विचाराने आजही आपण शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी कटिबध्द आहे, असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी होळीचा गाव ता.खटाव येथे व्यक्त केले ते विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड,जिल्हा परिषद सदस्य मानसिंग जगदाळे,उपसभापती सुहास बोराटे (पंचायत समिती कराड) शाखा अभियंता श्री कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आपला मुळचा संबंध सह्याद्री साखर कारखान्यामुळे आला व आता विधानसभेमुळे ते अधिक दृढ झाला आहे मतदारसंघातील सर्व विभागात समान न्यायाने निधी देण्यात यश आले असून सध्याच्या सरकारमधील मित्रपक्षांचे एकमेकांशी जुळत  नसलेने प्रशासनावर पकड राहील नसून त्याचा विकास कामांवर  परिणाम झाला आहे. देशामध्ये व राज्यामध्ये सर्वत्र अस्थिरता स्थिरपणा आला आहे या विभागाने नेहमी मान्य श्री पवार साहेबांवर प्रेम केले आहे पवार साहेबांनी त्या शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले त्यामुळे साखर उद्योगासह सर्वसामान्य सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे परंतु आताचे सरकार काही निर्णय घेत नाही त्यामुळे सर्वत्र उदासिनता आहे सत्तेचा सर्व सर्वसामान्यांना न्याय देणेसाठी व्हावा अशी अपेक्षा आहे गावांमधील सर्वानी विकास कामासाठी एकत्र राहावे तसेच उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले. दरम्यान गावांमधील वय वर्षे ७५ च्या पुढील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व नवनिर्वाचित  उपसरपंच धनंजय माळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती शिवाजीराव सर्वगोड जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे उपसभापती सुहास बोराटे आदींनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास परिसरातील व गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पांडुरंग शिंदे (नाना) यांनी केले तर प्रस्ताविक माजी पंचायत सदस्य श्री भाऊसाहेब लादे यांनी केले.

No comments:

Post a Comment