जनता क्रांती दलाच्या वतीने नांदोशी पुलावर अर्धा तास रास्ता रोको - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, August 7, 2018

जनता क्रांती दलाच्या वतीने नांदोशी पुलावर अर्धा तास रास्ता रोको


औंध:- अपघातग्रस्त नांदोशी पुलाच्या विविध मागण्यांसाठी पुलावरच अर्धा तास रस्ता रोको करण्यात आला .पुलाच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात यावी यासाठी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.यावेळी वाहनांची मोठी रांगच लागली होती.


                    औंध-सातारा रोडवरील नांदोशी हा महत्वाचा पूल असून या पुलास दोन्ही बाजूने संरक्षक कठडे व,रिफ्लेकटर खांब नाहीत पूल अरुंद असल्याने एकाच वेळी दोन गाड्या पास होताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे,प्रशासनाला वारंवार नांदोशी,औंध ग्रामस्थ व जनता क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडी व लेखी निवेदन देऊन पुलाच्या समस्यांविषयी सुधारणा झाल्या नसल्याने मंगळवारी रस्ता रोको करण्यात आला.यामुळे औंधच्या आठवडी बाजारात येणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.


               यावेळी औंध पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील जाधव यांच्याकडे कार्यकर्त्यांनी प्रमुख मागण्याचे निवेदन दिले ,यामध्ये नवीन पुलाच्या कामासाठी त्वरित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा,आताच्या पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षक कठडा बांधावा, नवीन पूल होईपर्यंत रिफ्लेकटर खांब व अरुंद पूल असल्याचा सुचनाफलक लावण्याच्या प्रमुख मागणी यावेळी करण्यात आल्या.यावेळी सत्यवान कमाने, वसंतबाबा गोसावी,सुखदेव इंगळे,विनोद थोरात, गणेश इंगळे,कुलदीप इंगळे,शिवाजी रणदिवे,प्रशांत सर्वगोड,निलेश खैरमोडे, योगेश भोसले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:

Post a Comment