फलटण प्राथमिक शिक्षक विविध मागण्यांसाठी संपात सहभागी - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 8, 2018

फलटण प्राथमिक शिक्षक विविध मागण्यांसाठी संपात सहभागी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

फलटण :- फलटण प्राथमिक शिक्षक समनव्य समिती मार्फत संपाबाबत तहसिल कार्यालय फलटण व पंचायत समिती फलटण येथे संपाबाबत निवेदन देण्यात आले.


राज्य समनव्य समितीच्या निर्णया नुसार फलटण शिक्षक संघ व फलटण शिक्षक समिती या दोन प्रमुख संघटना बरोबर इतर संघटना या संपात आपल्या विविध मागण्यांसाठी संपात सहभागी आहेत. शिक्षक संघ अध्यक्ष संतोष कदम, शिक्षक समिती अध्यक्ष उत्तम निंबाळकर, बँक संचालक तुकाराम कदम, अनिल शिंदे ,विक्रम दिवटे तसेच शहाजी जाधव, संतोष निंबाळकर, देवदास कारंडे, दत्तात्रय ढेकळे, सुभाष ढालपे, राजकुमार जगताप ,संभाजी कदम आदी शिक्षक पदाधिकारी यांनी या संपात फलटण प्राथमिक शिक्षक 100% संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment