कराड चिपळूण मार्गावरील खड्डे त्वरित भरा, एल अँड टी कंपनीला निर्वाणीचा इशारा - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, August 7, 2018

कराड चिपळूण मार्गावरील खड्डे त्वरित भरा, एल अँड टी कंपनीला निर्वाणीचा इशारा

पाटण :- कराड चिपळूण मार्गावरील कराड ते घाटमाथा यादरम्यान रस्त्यावरील जागोजागचे खड्डे भरण्यासंदर्भात पाटण पंचायत समितीत एल अँड टी कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पाटण पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ७ दिवसांच्या आत या रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत, तर नाईलाजाने  रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा  इशारा उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी दिला.


कराड चिपळूण  मार्गावर  मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे जनतेची सहनशीलता आता संपली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने नाहक बळी जात आहेत. याकडे संबंधित एल अँड टी कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पाटण पंचायतीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी पंचायत समितीसमोर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.


या दरम्यान  आज सोमवारी पंचायत समितीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात एल अँड टी कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पाटण पोलीस अधिकारी  यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे,  मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, बाळासाहेब कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यु.ए.भापकर यांच्या सह खासगी  वडाप वाहतूक चालक/मालक यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment