हुल्लडबाज, रोडरोमिओेंना ‘निर्भया’चा दणका कॉलेज परिसरात धडक कारवाई - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 12, 2018

हुल्लडबाज, रोडरोमिओेंना ‘निर्भया’चा दणका कॉलेज परिसरात धडक कारवाई



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: महाविद्यालय परिसरातील हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी निर्भया पथकाने शनिवारी शहरातील छत्रपती शिवाजी, धनजंयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण तसेच आण्णासाहेब कल्याणी शाळा परिसर येथे कामाशिवाय फिरणार्‍या 33 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. यातील अल्पवयीन तरूणांना समज देवून सोडून देण्यात आले. 14 जणांवर सार्वजनिक शांतता भंग केल्यामुळे कारवाई करण्यात आली. तर तिघांकडून वाहनपरवाना, नंबर प्लेट नसल्यामुळे दंड आकारण्यात आला.
सध्या शहरात पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. कॉलेज सुरू झाल्याने परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महाविद्यालयांच्या परिसरात हे तरूण दुचाकी घेवून फिरत होते. तर काही मुलींच्या सोबत बोलत आरडाओरडाही करत असल्याचे आढळून आले.  या कारवाईने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, सातारा शहर प्रमुख नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment