खाजगी सावकरकीच्या त्रासास कंटाळून फलटण येथे एकाची आत्महत्या - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, August 18, 2018

खाजगी सावकरकीच्या त्रासास कंटाळून फलटण येथे एकाची आत्महत्या

सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क 

फलटण : खासगी सावकारीच्या सततच्या त्रासामुळे होळ ता.फलटण येथील विद्यमान उपसरपंच यांनी आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली.  या प्रकरणी पोलिसांनी संबंधित सावकारा विरोधात गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याने तसेच जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा नातलगांनी आरोप केला आहे. याप्रकरणी होळ ग्रामस्थांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याला घेराव घातला.


याबाबत अधिक माहिती अशी की, होळ ता.फलटण येथील विद्यमान उपसरपंच विनोद भोसले यांनी काल शुक्रवार दि.१७ रोजी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान जिंती - खुंटे रोडवर एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना आत्महत्या केलेली निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही होळ गावातील लोकांना व ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली. यानंतर घटनास्थळी पोलिसांना विनोद भोसले यांच्या खिशात चिट्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी पाच सावकारी लोकांची नावे, पत्ता, व्याजाने घेतलेली रक्कम, दिलेली रक्कम, मोबाईल नंबर लिहून ठेवला आहे. सदर याच  चिट्ठीच्या चार झेरॉक्स काढून एक चिट्ठी शर्ट मध्ये, एक पॅन्ट मध्ये,एक दुचाकीच्या डिग्गीत व एक मोबाईलच्या कव्हर मध्ये ठेवली होती. खाजगी सवकारानी बँकेची चेक व गाडीची कागदपत्रे घेतली आहे त्यांना सर्व पैसे देऊन सुद्धा ते भयंकर मानसिक त्रास देत आहेत असे विनोद भोसले यांनी चिठ्ठीत लिहले असल्याचा  दावा नातेवाईकानी केला आहे. चिट्ठीच्या आधारे  संबंधित खाजगी सावकारांच्यावरती गुन्हे दाखल होऊन अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. यानंतर पोलिसांनी खाजगी सावकारीबाबतीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने होळसह साखरवाडी परीसरातील लोकांनी पोलिस ठाण्याला घेरले. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment