दहिवडीत सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, August 7, 2018

दहिवडीत सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

दहिवडी :- राज्य सरकारी मध्यर्वती कर्मचारी संधटना च्या वतीने विविध मागण्यासाठी पुकरण्यात आलेल्या राज्यव्यापी संपात आज माण तालुक्यात पंचायत समिती माण (दहिवडी) व आंतर्गत कार्यालय, विभागातील विविध संघटनानी संपात सहभागी होत आज माण पंचायत समिती समोर निर्दशने करण्यात आली.


विविध कर्मचारी संधटणाच्या वतीने सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कंत्राटीकरण बंद करावे, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य मागण्यासाठी दिनांक ७,८,९ आँगस्ट दरम्याण संपाची हाक देण्यात आली होती. या हाकेला साद देत माण तालुक्यात शिक्षक संघटना, कृषी कर्मचारी संघटना,  ग्रामसेवक सघटना,  पशुसंर्वधन संधटना, लेखा कर्माचारी संघटना, लिपीकवर्गीय संघटना, आरोग्य कर्मचारी सघटना, वाहन चालक सघटना, वर्ग -३ सघटना ,चतुर्थ श्रेणी सघटना  यांच्यसह  विविध कर्मचारी संघटना सहभागी होत आज पंचायत समिती माण (दहिवडी) येथे निदर्शने करत जोरदार घोषणा देण्यात आला.दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजव्यापी संपात आज दहिवडी पंचायत समिती मधील विविध सघटनाचे कर्मचारी सहभागी झाल्याने दहिवडी पंचायत समितीमध्ये शुकशुकाट जाणवत होता.

No comments:

Post a Comment