दारूची चोरटी वाहतूक करण्याऱ्या एसटी वाहकाला अटक - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, August 7, 2018

दारूची चोरटी वाहतूक करण्याऱ्या एसटी वाहकाला अटक


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा :- पणजीहुन महाबळेश्‍वर निघालेल्या सटी मध्ये गोव्यातून दारूची चोरटी वाहतूक केली जात आहे. अशी माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी  महाळेश्‍वरकडे जाणाऱ्या एसटी मध्ये दारूची वाहतूक करणाऱ्या चक्क वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या वाहकाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान पोलिसांनी 42 हजार रुपये किमंतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.


महाबळेश्‍वर आगाराची बस क्रं. एम एच 14 पीटी 4631 ही बस पणजीहुन महाबळेश्‍वर निघाली होती. अभिजित बाळकृष्ण शिंदे रा. सुलतानपुर ता. वाई हा त्या बसचा वाहक होता. पणजी येथुन गोवा बानवटीच्या दारूच्या बाटल्या तो स्वस्तात विकत घेऊन महाबळेश्‍वरला विक्रीसाठी घेऊन जात होता. त्याने पणजी येथून दारूच्या बाटल्या बस मध्ये ठेवल्याची माहिती सातारा पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पो.नि. नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. दत्ता पवार, प्रवीण पवार, अरूण दगडे, केतन शिंदे, राहुल खाडे यांनी बस सातारा बसस्थानकात येताच पोलिसांनी एसटीची झडती घेतली असता बसमध्ये 42 हजार रुपये किमंतीच्या गोवा बनावटीच्या 60 दारूच्या बाटल्या सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी बाटल्यासह अभिजित बाळकृष्ण शिंदे रा. सुलतानपुर ता. वाई याला अटक केली आहे.

No comments:

Post a Comment