वाठार निंबाळकरमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 31, 2018

वाठार निंबाळकरमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान (पहा व्हिडिओ)




फलटण : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्सच्या जागेत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत लाकूड, पाचट, बायोमास ब्रिकेट, अनेक वाहने या आगीत जळून खाक झाली असून या लागलेल्या आगीत अंदाजे वीस कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

फलटण ते पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर या गावाच्या हद्दीत स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांची आयुर ट्रेडर्स ही कंपनी आहे. या कंपनीत 20 एकर जागेत लाकूड, बगैस, प्रेसमड, पाचट, लाकडाचा भुसा, ब्रिकेट बायोमास ब्रिकेटचा उद्योग आहे. या जागेतून वीजवाहक तारा गेल्या आहेत. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने ठिणग्या उडून आग लागली. रात्रभर जास्त वारे असल्याने हि आग वेगाने पसरली. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. फलटण नगरपालिकेचा अग्निशमन ही घटनास्थळी आला. मात्र तोपर्यंत आग वेगाने पसरून सर्व जळून खाक झाले. या आगीत चार ट्रेक्टर, दोन ट्रक, एक टेम्पो, टँकर जळून खाक झाले. आगीत अंदाजे वीस कोटींचे नुकसान झालेचा अंदाज आहे. घटनास्थळी कृष्णा खोरेचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक- निंबाळकर, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, तहसीलदार विजय पाटील, महसूल अधिकारी, पोलीस, काँग्रेस कार्यकर्ते यांनी भेट दिली.    

No comments:

Post a Comment