विक्रमबाबांनी कृषी अधिकार्‍याला थोबाडले - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, August 30, 2018

विक्रमबाबांनी कृषी अधिकार्‍याला थोबाडले




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण : कृषी विभागाने घेतलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी चक्क तालुका कृषी अधिकार्‍याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. मल्हारपेठ येथील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी  गुरूवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली.
प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अंगावर जाण्याचे हे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पाटण तालुक्यात पावसाचा वाढता जोर असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विक्रमबाबा पाटणकर करत होते. मल्हारपेठ येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात विक्रमबाबा पाटणकर यांचा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटी यांच्याशी वादवादी झाली. यातून पाटणकर यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आवटी यांनी त्यांना विरोध केला असता पाटणकर यांनी कृषी अधिकारी आवटी यांच्या कानशिलात लगवाली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.
या प्रकारानंतर विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान कृषी विभागाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

No comments:

Post a Comment