कराड उत्तर मधील पेयजल योजनांसाठी ३५ कोटींचा निधी - मा.मनोजदादा घोरपडे - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 31, 2018

कराड उत्तर मधील पेयजल योजनांसाठी ३५ कोटींचा निधी - मा.मनोजदादा घोरपडे


सत्य  सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा: कराड उत्तर मतदारसंघामधील ६० गावांना ३५ कोटी ०६ लाखांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांसाठी निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, महसूलमंञी मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील, पाणी पुरवठा मंञी मा. श्री.बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा राज्यमंञी मा.श्री.सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्यासह राज्य सहकार परिषदेचे उपाध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाग्यश्री मोहिते, पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार  यांच्या प्रयत्नांना यश आले असून कराड उत्तरच्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे भाजपाचे प्रयत्न असल्याचे मत कराड उत्तरेचे भाजपा नेते मा.मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.

तालुका कराड:  राजमाची ४६ लाख ८७ हजार, रिसवड ३५ लाख, सयापूर १५ लाख, शामगांव २० लाख, शिवडे ४० लाख, उत्तर कोपर्डे १५ लाख, वाघेरी ३० लाख, यादववाडी १५ लाख, यशवंतनगर ३५ लाख, किवळ २१ लाख, कोरेगाव २० लाख, कोरिवले ६ लाख ५० हजार, मसूर ६ कोटी, निगडी २५ लाख, पाडळी (हेळगाव) ११ लाख, पाल ६ कोटी, पेरले १ कोटी, अंधारवाडी ३० लाख, वराडे ४० लाख, अंतवडी ४० लाख, बाबरमाची ४० लाख, भांबे १२ लाख, भोसलेवाडी ५० लाख, चरेगाव २२ लाख, चरेगाव (बेगर वस्ती) २० लाख, चोरजवाडी ४० लाख, धावरवाडी ५० लाख, हजारमाची ३० लाख, हजारमाची (मागास वस्ती) ६ लाख ५० हजार, हरपळवाडी ९० लाख, हेळगाव ४५ लाख, इंदोली ८ लाख, कालगाव १० लाख, कामथी ४० लाख, करवडी २५ लाख.

खटाव तालुका : गोरेगांव (वांगी) ७७ लाख, मुसांडवाडी १८ लाख, पुसेसावळी २ कोटी ५० लाख, राजाचे कुर्ले ८४ लाख, उंचीठाणे १८ लाख.

कोरेगाव तालुका:  आर्वी ७९ लाख २ हजार, बेलेवाडी २५ लाख, पिंपरी २५ लाख, साप २४ लाख १३ हजार, सासुर्वे ५० लाख, साठेवाडी २० लाख, सुर्ली ६८ लाख २९ हजार.

सातारा तालुका : जावळवाडी ३० लाख, कामेरी ५० लाख, काशीळ २ कोटी ६ लाख, लांडेवाडी २५ लाख, मत्त्यापूर २५ लाख, नागठाणे (बौध्द वस्ती) १५ लाख, नागठाणे ४० लाख, निसराळे ५० लाख, तुकाईवाडी ४० लाख, वर्णे ५ लाख, वेणेगाव (बौध्द वस्ती) २५ लाख १६ हजार, वेणेगाव २३ लाख.

कराड उत्तर मधील बराचशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. तो या योजनेच्या माध्यमातून मार्गी लागणार असून लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने गावातील लोकांमध्ये समाधान असून महाराष्ट्र शासनास धन्यवाद दिले आहेत. उर्वरीत गावांच्या योजना मंजूरीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मा.मनोजदादा घोरपडे यांनी प्रसिध्दी पञकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment