फलटण येथे तरुणाला चाकूने भोकसले - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 10, 2018

फलटण येथे तरुणाला चाकूने भोकसले


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण : दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका 23 वर्षे वयाच्या तरुणाला तीन तरुणांनी चाकूने भोसकुंन गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील रविवार पेठ येथे घडली आहे.
याबाबतची ओमकार संजय शिंदे वय 23 वर्षे (राहणार रविवार पेठ सिमेंट रोड फलटण) याने दिलेल्या फिर्यादिनुसार तो रविवार पेठेतिल  परिवार साडी सेंटर जवळ मित्रांसोबत उभा असताना दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून स्कूटर वरून हैदर मेटकरी तौफीक मेटकरी ( दोन्ही राहणार रविवार पेठ मेटकरी गल्ली फलटण) व एक अनोळखी तरुण आले तौफीकने माझ्या तोंडावर फाइट मारली अनोळखी तरुणाने पकडले तर हैदरने त्याच्या हातातील चाकूने माझ्या पाठित दोन्ही खुब्यावर आणि अवघड जागेच्या कडेला चा़कू मारून गंभीर जखमी केले आणि पळून गेले अशी फिर्याद ओमकारने दिली आहे.
 त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक गायकवा करीत आहेत. 

No comments:

Post a Comment