लाच घेऊन फौजदार पळाला, हवालदार सापडला, दोन कारवायांनी पोलीस दल हादरले - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 10, 2018

लाच घेऊन फौजदार पळाला, हवालदार सापडला, दोन कारवायांनी पोलीस दल हादरले



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी/म्हसवड: माण तालुक्यातील दहिवडी व म्हसवड पोलीस ठाण्यातील दोन लाचखोरीच्या घटनांनी माण तालुक्यात खळबळ उडाली. एका प्रकरणात 13 हजारांची लाच घेऊन दहिवडीच्या पोलीस उपनिरीक्षकाने लाच घेऊन धूम ठोकली तर दुसर्‍या कारवाईत म्हसवड पोलीस ठाण्यातील हवालदार रंगेहाथ सापडला. पोलीस उपनिरीक्षक सतीश दबडे व हवालदार बबन पवार अशी या लाचखोरांची नावे आहेत. या घटनेमुळे पोलीस दलही हादरून गेले  आहे.
दहिवडी : बिअरबार हॉटेल वरील कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास न पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून कडून 13 हजार रुपयांची लाच घेऊन दहिवडी पोलिस ठाण्यात नव्यानेच हजर झालेला पोलीस उपनिरीक्षक सतीश दबडे याने चार चाकी वाहनात बसून सातारा लाच लुचपत विभागाच्या पथकाला झासा देवून धूम ठोकली. दहिवडी पोलीस ठाण्यात दबडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दहिवडी येथील एका बिअर हॉटेलचा बारचा चुकीचा अहवाल न पाठवण्यासाठी दबडे यांनी तकारदार यांना 25 हजाराची लाच मागितली होती. 13 हजार रुपये देण्यावर दबडे आणि तक्रार दार याच्यात तडजोड झाली. यानंतर तक्रारदार यांनी बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी लाच मागितल्याची तक्रार सातारा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडेकेली होती. तक्रारीनुसार दहिवडी पोलीस ठाण्यात येथे सापळा लावण्यात आला होता. मात्र, सापळा लागल्याची कुणकुण लागताच लाचखोर फौजदार सतीश दबडे यांनी तक्रार दार यांच्या कडून 13 हजार रुपयांची रक्कम घेतली. पोलिसांनी पकडायच्या आत दबडे याने चार चाकी वहानातून लाच लुचपत विभागाच्या कर्मचार्‍यांना झासा देत धूम ठोकली. दबडे याच्या वहानाचा पाठलाग केला मात्र भरघाव वेगाने पळून गेला.
दरम्यान, दबडे याने पळुन जाताना त्याने गाडीने धक्का पोलिसांना दिल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दहिवडी येतील विश्राम गृहावर थांबले आहेत.
बबन पवार सापडला
म्हसवड: येथील एका तक्रारदारावर गुटखा विक्रीबाबत गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई झाली होती. त्यामध्ये जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली व गुन्हा दाखल झाल्यास मदत करतो असे आश्‍वासन देवून त्याबदल्यात 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना म्हसवड पोलीस ठाण्याचे हेडकान्स्टेबल बबन काळू पवार (वय 42) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराचा तंबाखूचा व्यवसाय आहे. ते चोरी छुपके महाराष्ट्रात गुटख्याला बंदी असताना देखील गुटखा विक्री करत होते. याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळताच त्यांनी तक्रारदारावर छापा टाकून गुटख्याचा माल जप्त केला होता. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेचा तपास बबन काळू पवारकडे होता. त्यांनी तक्रारदार यांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली. तसेच यापुढेही गुन्हा दाखल झाल्यास तुम्हाला मदत करतो असे सांगून या कामासाठी 2 हजार रुपयांची लाच मागितली होती.
पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला, पोलीस नाईक संजय साळुंखे, प्रशांत ताटे व विशाल खरात यांनी कारवाईत सहभाग घेवून पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडला.

No comments:

Post a Comment