अज्ञात चोरट्यांनी युवकास लुटले - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, August 25, 2018

अज्ञात चोरट्यांनी युवकास लुटले




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे ता.कराड गावच्या हद्दीत असणार्‍या टोलनाक्यावरून  घरी जाण्यासाठी थांबलेल्या  तीस वर्षीय  युवकास कारमधून अज्ञात तीन जणांनी कारमधून नेऊन त्याच्याकडील  जबरदस्तीने  लपटॉप ,मोबाईल ,2 हजार रुपयांची रोकड तसेच डेबिट कार्डमधील  44हजार 500 रुपयांची रोकड असा मिळून सुमारे एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवार दि.25 रोजी पहाटे घडली. चंद्रकांत विश्वनाथ ताटे वय. 30 रा. वहांगाव ता. कराड असे लुटलेल्या युवकाचे नाव आहे.     

याबाबत तळबीड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्यावर चंद्रकांत ताटे हे नवी मुंबईहून शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वहांगाव ता. कराड येथे जाण्यासाठी  उतरले त्याच दरम्यान, कोल्हापूर दिशेला जाणारी पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार त्याच्याजवळ आली व गाडीतील अंदाजे 40 वयोगटातील अज्ञात इसमांनी ताटे यांना कहा जानेवाले हो असे विचारले असता ताटे सदर कारमध्ये बसले काही अंतर गेल्यानंतर अज्ञात इसमाने कार वहागांव येथे न थांबवता कोल्हापूर दिशेने नेली. यावेळी  त्यांच्याकडे असलेला लॅपटॉप ,पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच त्यांच्या जवळील 2 हजार रुपयांची रोकड व डेबिट कार्ड जबरदस्तीने काढून घेऊन  कार्डचा पिन कोड जबरदस्तीने घेऊन त्यामधील 44 हजार 500 रुपयांची रोकड काढून घेऊन सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून ताटे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गावरील तांदुळवाडी गावच्या हद्दीत हातपाय बांधून सोडून ददिले व अज्ञातांनी कारसह पोबारा केला.  यानंतर ताटे यांनी सदर घटनेची फिर्याद तळबीड पोलीस ठाण्यात दिली यावरून अज्ञात तीन चोरट्यांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी जाधव करीत आहेत.







No comments:

Post a Comment