अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना विद्यार्थ्यीनींची मायेची राखी - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, August 25, 2018

अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना विद्यार्थ्यीनींची मायेची राखी




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

उंब्रज : समाजातील स्त्रीयांच्या रक्षणासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या पोलिसांना  व्यस्त  कामातून रक्षाबंधना दिवशीही सुट्टी मिळत नाही त्यामुळे जीवाभावाची सख्खी बहीण असतानाही ऐन रक्षाबंधना दिवशी हातावर राखी बांधुन घेता येत नाही. याची खंत बहुतांशी पोलिसांना असते. बहीण पोलीस भावाची या दिवशी आतुरतेने वाट पहात असते पंरतू  असंख्य भावाबहीणीच्या सुरक्षिततेसाठी हा पोलीस भाऊ ड्युटी बजावत असतो. पंरतू शनिवारी उंब्रज येथील     उंब्रज  जिल्हा परिषद शाळेच्या मुलींना पोलिसांना राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी समस्त पोलिसांचे मन भरून आले. 


उंब्रज ता.कराड येथील पोलीस ठाण्याच्या आवारात हा सोहळा संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळेच्या मुलींना स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिसांच्या हातावर बांधल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्फुर्तपणे राख्या बांधुन घेतल्या. यावेळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, बजरंग कापसे, उपनिरीक्षक रवींद्र शिंदे, एम.के आवळे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उपशिक्षिका सुरेखा भोसले, रोटरीचे अध्यक्ष राजीव रावळ, कमलाकर पाटील, सुधाकर जाधव, राजेंद्र सावंत तसेच सदस्य उपस्थित होते.विद्यार्थीनीनी  पोलीसदादानां राख्या बांधून त्यांचे औक्षण केले व पेढा भरवला. पोलिसांनी विद्यार्थ्यांनीच्या राख्यांचा स्विकार करुन त्यांना धन्यवाद दिले. अनेक पोलिसांचे हातावर राखी बांधुन घेतना मन भरून आल्याचे चित्र होते.


सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले म्हणाले,  रक्षाबंधन हा पवित्र सण असुन राखी बांधणाऱ्या बहीणीची राखी बांधुन घेणाऱ्या भावाने रक्षा करणे हा या बंधना मागचा मुख्य हेतु आहे.  समाजातील कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्याचा वसा पोलिसांनी घेतला असुन चिमुकल्या विद्यार्थ्यीनीनी राख्या बांधून त्यांच्या रक्षणाच्या जबाबदारीची जाणिव करुन दिली आहे. समाजात  नवनवीन आव्हाने व धोके निर्माण झाले आहेत पंरतू उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदैव समाज रक्षणाचे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


राखी बांधल्यानंतर बहीणीला काहीतरी ओवाळणी देण्याचा रिवाज आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलींना खाऊ वाटप केले. पंरतू पोलीस हवालदार सतीश मयेकर यांच्या हातावर ज्या मुलीने राखी बांधली त्या मुलीचा १० वी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय  मयेकर यांनी घेतला असुन त्यांच्या या निर्णयाचे शाळेच्या शिक्षकांनी तसेच उपस्थित पोलिसांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. शालवी सचीन कुरकूटे असे या विद्यार्थ्यीनीचे नाव असुन ती गरीब कुटुंबातील आहे. मागील तीन वर्षांपासून सतीश मयेकर हे उंब्रज पोलीस ठाण्यात सेवा बजावत असुन त्यांच्या अनेक चांगल्या उपक्रमांमध्ये सहभाग असतो.यावेळी सुरेखा भोसले यांनी मनोगत व्यक्त करुन राखी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले

No comments:

Post a Comment