माण तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी एम. के. भोसले - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 8, 2018

माण तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी एम. के. भोसले


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
देवापुर  
माण तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी एम. के. भोसले यांची निवड करण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे समजते .          
माण तालुका कॉंग्रेसची धुरा माजी अध्यक्ष अर्जुनतात्या काळे यांचेकडून माजी जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कॉंग्रेसचे दिर्घकाळ तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, उपजिल्हाध्यक्ष तसेच इंट्‌कचे 16 वर्षे जिल्हाध्यक्षपद भूषविणाऱ्या भोसलेंना संघटनात्मक बांधणीचा चांगला अनुभव आहे.  तसेच ते महाराष्ट्र एस  टी युनियन इन्तक चे २००२ पासून जिल्हाध्यक्ष आहेत.ते काँग्रेस चळवळीत काम केलेले कार्यकर्ते आहेत . त्यांनी एस . टी कर्मचाऱ्यांसाठी अनेक  मोर्चे  उपोषणे केली आहेत .  त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकारण व समाजकारणाशी निगडित असून  त्यांच्या पत्नी सो  पुष्पावती भोसले ह्या बिजवडी गावाच्या सरपंच होत्या . तर त्यांचे चिरंजीव योगेश भोसले हे बिजवडीचे उपसरपंच आहेत .                                                                                 माण-खटाव विधानसभा मतदारसंघावर   अनेक  वर्षे आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्त्वाखालील कॉंग्रेसचे वर्चस्व आहे.  इतर पक्षांची परिस्थिती पहाता आ. गोरेंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची संघटनात्मक बांधणी चांगली आहे.
तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना एम. के. भोसले म्हणाले कि माण तालुक्यात आ. गोरेंच्या कुशल नेतृत्त्वाखाली इतरांच्या तुलनेत कॉंग्रेस  सक्षम आहे. पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षाची विचारधारा आणखी तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. 
    त्यांचे अभिनंदन माण खटावचे आ .जयकुमार गोरे, मा तालुकाध्यक्ष अर्जुनतात्या काळे , जि .प सदस्य भीमरावकाका पाटील ,किरण बर्गे अर्चना बर्गे  माढा युवक मतदार संघाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले  जि .प सदस्य अरुण गोरे ,हरिभाऊ जगदाळें  मा उपसभापती अतुल जाधव  विशाल बागल यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment