३१ आँँगस्ट पूर्वी शेतकऱ्यांची ऊस बिले जमा करणार-जनरल मॅनेजर जाधव - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 8, 2018

३१ आँँगस्ट पूर्वी शेतकऱ्यांची ऊस बिले जमा करणार-जनरल मॅनेजर जाधव


औंध:-२०१७-१८च्या गळीत हंगामासाठी ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस ग्रीन पॉवर शुगर्स कडे पाठविला आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे ऊस बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३१ आगस्ट पूर्वी जमा करणार असल्याची माहिती जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
                       प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,कारखाना उभारणी पासून सन १४-१५,१५-१६ व १६-१७ च्यागळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाची बिले वेळेत अदा केली असून ग्रीन पॉवर शुगर्सने आपल्या सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांना इतर कारखान्याच्या  बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न केला आहे.२०१७-१८  च्या गळीत हंगामामध्ये ऊसाचे व पर्यायाने साखरेचे अतिरिक्त उत्पादन झालेमुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये साखरेचे दर उतरले,तसेच देशपातळीवर साखर उद्योगांच्या समस्येवर तोडगा निघणेस विलंब झाल्याने कारखाना व्यवस्थापनास उत्पादित झालेल्या साखरेची विक्री करणे अशक्य झाले होते या हंगामात देशातील व महाराष्ट्रातील जवळपास ८०% साखर कारखाने विहित वेळेत शेतकऱ्यांना ऊस बिल देऊ शकले नाहीत.ग्रीन पॉवर शुगर्सकडून दि.३१ आगस्ट पूर्वी  संबधीत शेतकऱ्यांना ऊस बिले अदा केली जातील, तरी सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन हणमंतराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment