मंदिरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, August 25, 2018

मंदिरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


गोंदवले : आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर झालेल्या अन्यायाला पोलिसांनी सुध्दा न्याय न दिलेच्या कारणावरून आज ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरावर असणाऱ्या शिखरावर चढून एका मनोरुग्ण प्रवृत्तीच्या इसमाने दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱयांनी  निकराचे प्रयत्न केले मात्र त्याने स्वतःवर धारदार ब्लेडच्या साहाय्याने गळ्यावर वार करून घेतले त्याला अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


आज श्री क्षेत्र गोंदवले येतील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरावर अतिशय आखीव रेखीव कळस असून हा कळस सुमारे तीस फूट उंचीचा आहे त्या कळसावर कोरीव काम केलेले असून कोरीव खिडक्या असून प्रत्येक खिडकीवर नक्षीकाम आहे त्यावर पितळी अणकुचीदार छोटे छोटे कळस आहेत आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात पुणे येतील असणाऱ्या देहूगाव येतील राजू आर कदम ह्या नावाचा इसम भाविक म्हणून आला होता प्रथम त्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले दुपारच्या आरतीला पण तो उपस्तीत होता त्यानंतर दुपारी मंदिर परिसरात इकडे तिकडे जास्त गर्दी नाही असं बघून त्याने मंदिरावर चढण्यास सुरुवात केली व पहिल्यांदा पत्रयावर चढला यावेळी माणसांनी त्याला अटकाव करण्यास सुरुवात केली मात्र त्याने माझी पाचशे रुपयांची नोट वाऱ्या ने वर गेली आहे असं सांगत तो लोखंडी शिडी वरून वर चढला हे सगळे भक्त आणि येणारे जाणारे पाहत होते त्यानंतर येते मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होऊ लागली पोलिसांना फोन करून बोलवण्यात आलं तीन वाजण्याच्या सुमारास दहिवडी चे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आपल्या अन्य सहकार्याच्या सह मंदिरात दाखल झाले व त्याला विनवणी करू लागले मात्र त्याने ऐकले नाही तो वारंवार काही ही मागण्या करू लागला त्यानंतर त्याने माईक ची मागणी केली व त्यावरून तो त्याची अडचण सांगणार होता मात्र माईक देऊन ही तो खाली यायचं नाव घेत नव्हता सतत तो मी उडी मारणार आहे असं सांगत होता पोलिसांनी मग म्हसवडच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले रुग्णवाहिका ही तैनात ठेवली होती मंदिराच्या खाली माण खटाव चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तहसीलदार माने उपस्तीत होत्या हे सगळे पाहण्यासाठी हजारो लोक मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर उभे होते लोक दिसेल त्या ठिकाणाहून हे दृश्य पाहत होते प्रांताधिकारी कांबळे यांनी सांगून सुद्धा यो ऐकत नव्हता मंदिराच्या शिखरावर कोणी जाण्याचा प्रयत्न केला की तो ओरडायचा माझ्यावर अन्याय झाला असून त्यात पोलिसही सामील आहेत त्यामुळे माझा कोणावरही विश्वास नाही म्हणून निषेध करण्यासाठी गोंदवले लागला.त्यावेळी उपस्थित सर्वांचीच भंभेरी उडाली.त्याला खाली उतरण्यासाठी विनंतीही झाली.परंतु काहीच उपयोग होत नसल्याने पोलिसांना बोलावण्यात आले.दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे तातडीने घटनास्थळी आले.त्यांनीही त्याला खाली येण्याची विनंती केली मात्र तो काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता लागला.



त्यानंतरही विभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,अंगराज कट्टे,श्रीकृष्ण कट्टे,सचिन पाटोळे यांच्यासह अनेक युवकांनी कदम याला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही देऊन खाली उतरण्याची विनंती केली.परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर शिखराच्या चारी बाजूला कापडी जाळीचे कापड बांधण्यात आले.व त्याच्या काही युवक थेट शिखरावर चढले.त्यावेळी गोंधळला कदम शिखराच्या टोकावर जाऊन बसला.मात्र युवकांनी धाडसाने त्याला पकडले. त्यानंतरही विभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,अंगराज कट्टे,श्रीकृष्ण कट्टे,सचिन पाटोळे यांच्यासह अनेक युवकांनी कदम याला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही देऊन खाली उतरण्याची विनंती केली.परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर शिखराच्या चारी बाजूला कापडी जाळीचे कापड बांधण्यात आले.व त्याच्या काही युवक थेट शिखरावर चढले.त्यावेळी गोंधळला कदम शिखराच्या टोकावर जाऊन बसला.मात्र युवकांनी धाडसाने त्याला पकडले.त्याने खिशात आणलेल्या ब्लेडने स्वतःच्याच मानेवर व गेल्यावर वार करण्यास सुरुवात केली.त्यावेळी त्याला पकडून ठेवलेल्या युवकांनी मोठया शिताफीने त्याच्या हातातून ब्लेड काढून घेतले.त्याला दोरीने बांधण्यात आले.मात्र दोरी सोडवून त्याने थेट खाली उडी घेण्याचा प्रयत्न केला.तरुणांनी मात्र त्याचा पाय घट्ट धरून ठेवल्याने त्याचा हाही प्रयत्न फसला.प्रतिकाराला न जुमानता हळू हळू त्याला खाली घेण्यात आले.आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.ब्लेडने वार केल्याने रक्तबंबाळ झाल्याने तातडीने दहिवडी ग्रामीण रुग्णालय व नंतर सातारा येथील दवाखान्यात नेण्यात आले

No comments:

Post a Comment