वेळे येथे हायवेच्या जाळ्या व गटाराची अनाधिकृतपणे तोडफोड : नियम धाब्यावर - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 29, 2018

वेळे येथे हायवेच्या जाळ्या व गटाराची अनाधिकृतपणे तोडफोड : नियम धाब्यावर





सत्य  सह्याद्री न्यूज नेटवर्क
वेळे : .वेळे, ता.वाई येथे नव्याने सुरू झालेल्या जिजाई पेट्रोलियम या पेट्रोल पंपाच्या मालकाने हायवेला बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या व आर.सी.सी. गटाराची तोडफोड करून पेट्रोल पंपासाठी अनाधिकृतपणे रस्ता बनविण्याचे काम सुरू केले आहे. हे काम नियमबाह्य असून या कामाबद्दल राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोणतीही परवानगी दिलेली नाही.
महामार्गावरील संरक्षक जाळ्या व गटार तोडल्यामुळे येथे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्गावरून येणार्‍या दिशेने उतार असल्यामुळे वाहने जोरात येतात. अश्यातच या पंपासमोर केलेल्या तोडफोडीमुळे जर काही अपघात झाला तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. याला जबाबदार कोण राहणार?
सदरील पेट्रोल पंप हा सेवा रस्त्याच्या पूर्वेस असून या पंपासमोरून जाणारा सेवा रस्ता हा पंपापासून दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरावर महामार्गाला जावून मिळालेला आहे. वास्तविक पाहता येथे महामार्गावर तोडफोड करण्याची काहीही आवश्यकता नाही. नियमाप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी महामार्गाचे संरक्षक कठडे किंवा जाळ्या बेकायदेशीररीत्या तोडणे हा गंभीर गुन्हा आहे मग प्रशासन यावर कोणती कारवाई करते हे खूप महत्वाचे आहे. सदर पेट्रोल पंप हा  ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार यांचे मालकीचा आहे. प्रशासनाने त्यांचेवर कारवाई करावी व हा रस्ता पूर्ववत करावा हीच मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment