धनगर समाजाच्या आंदोलनस्थळी अधिकार्‍यांची भेट - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, August 6, 2018

धनगर समाजाच्या आंदोलनस्थळी अधिकार्‍यांची भेट



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण : धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत संतोष जाधव व तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी भेट देऊन धनगर समाज यांची सरकारकडून अपेक्षित असणार्‍या आरक्षणाच्या मागणीची माहिती घेतली व गेली नऊ दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पुढील दोन दिवसात आंदोलन स्थगिती करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने दिले गेले.


धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने धनगर समाजाच्या अनुसुचित जमात (एस.टी) आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन नवव्या दिवशी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी धनगर समाजाच्या बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार्‍या धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


दि 29 जुलै पासून धनगर समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनात धनगर समाज बांधव शेळी मेंढयासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच जागरण गोंधळ, गजी नृत्य, ढोल नाद, आशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. विविध प्रकारचे आंदोलन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले. धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. धनगर शब्दामध्ये ‘र’ चा ‘ड’ झालेला असून तो देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात आली आहे

No comments:

Post a Comment