फलटण मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, August 6, 2018

फलटण मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण : मराठा आरक्षण मागणीसाठी येथील प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवारी बाराव्या दिवशी मागे घेण्यात आले. या आंदोलनाला शहर व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा आंदोलनाची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून मेगा भरतीला मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्थगिती दिली वैधानिक पूर्तता करून नोव्हेंबरमध्ये आरक्षण देणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.


प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सरकारला या मागण्यांचे निवेदन पोहोचवले असून आपले ठिय्या आंदोलन स्थगित करावे असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक यांना विनंती केली त्या नंतर बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत हे उपस्थित होते.


12 दिवस चाललेल्या आंदोलनात मराठा समाजातील स्त्री/पुरुष विशेषतः तरुणवर्ग मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते गेली 12 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात शांततेच्या मार्गाने व अनोख्या मार्गाने केलेल्या विविध मागण्यांसाठी केलेले हे ठिय्या आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने केल्या बद्दल शासनाने मराठा समाजाचे कौतुक केले कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व तालुक्यातील गावे शांत राहिली असल्याने आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून येथून पुढे मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने लवकर आरक्षण द्यावे असे मराठा क्रांती मोर्चा चे वतीने आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment