गावचा कारभारी कोण? आज ठरणार निकालाची उत्सुकता वाढली वेळे येथे चुरशीने मतदान, लोकनियुक्त सरपंचपदासह 10 सदस्यांचा आज फैसला - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 26, 2018

गावचा कारभारी कोण? आज ठरणार निकालाची उत्सुकता वाढली वेळे येथे चुरशीने मतदान, लोकनियुक्त सरपंचपदासह 10 सदस्यांचा आज फैसला


अभिनव पवार/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

वेळे : ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक सन 2018 ते 2023 यानिमित्ताने वेळे येथील मतदारांनी गावचा कारभारी कोण असावा यासाठी उस्फूर्त मतदान केले. यंदा पहिल्यांदाच सरपंच हा जनतेतून निवडून जाणार असल्यामुळे या निवडणूकीला खास महत्व आले आहे.


दोन पॅनलसह अपक्ष उमेदवारदेखील रिंगणात आहेत. सरपंचपद हे आरक्षित असल्यामुळे आणि अपक्ष उमेदवारांच्या उमेदवारीमुळे यंदा सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पॅनेलबरोबरच अपक्ष उमेदवारांचे भवितव्य काय असेल याचा निकाल आज होणार आहे. सरपंच पदासह एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी श्री भैरवनाथ पॅनलच्या वतीने एकूण 9 उमेदवार तर भैरवनाथ विकास आघाडीचे वतीने एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत तर एकूण अपक्ष उमेदवारांची संख्या 7 आहे


सरपंच पदासाठी अपक्षांसह एकूण 5 उमेदवार रिंगणात असून खरी चुरस मात्र 3 उमेदवारांमध्येच आहे. पैकी सुभाष लोखंडे, संग्राम लोखंडे आणि दत्तात्रय लांडगे हे तीन अपक्ष उमेदवार असून श्री भैरवनाथ पॅनलचे रफिक ईनामदार व भैरवनाथ विकास आघाडीचे दीपक पवार असे उमेदवार आहेत. यापैकी दोन्ही पॅनलबरोबरच अपक्ष दत्तात्रय लांडगे यांच्यामध्येच चुरस निर्माण झाली आहे. आता यामध्ये बाजी कोण मारणार याची उत्कंठा सर्व गावाला लागली आहे.


सदस्य पदासाठी शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ पॅनलचे उमेदवार सविता पवार, रफिक ईनामदार, संतोष गायकवाड, संतोष नलावडे, शुभांगी डेरे, शीतल पवार, संजय पवार, रोहिणी भिलारे, स्वप्ना पवार तर जिजाबा पवार व एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ विकास आघाडीचे उमेदवार सुरेखा पवार, धीरज शिंदे, विजय गायकवाड, स्वप्नील जाधव, सुमन पवार, माधुरी पवार, स्वप्नील कांगडे, संगीता महामुनी, वर्षा भिलारे आणि अपक्ष उमेदवार शशिकांत महामुनी, कल्पना पवार, विलास नलावडे, सुनील कांगडे जाधव हे रिंगणात आहेत. त्यापैकी सुनील कांगडे जाधव यांनी भैरवनाथ विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरूर मंडलचे प्रमुख श्री.जाधव काम पाहत आहेत.

 

भैरवनाथ वार्ड क्रमांक 1 मध्ये 724, विठ्ठल वार्ड क्रमांक 2 मध्ये 603 तर हनुमान वार्ड क्रमांक 3 मध्ये 760 मतदार गावचा कारभारी ठरवणार आहेत दुपारी 12.30 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले. आता वेळे गावच्या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे आज समजणार आहे. आता प्रतीक्षा फक्त निकालाचीच आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता सरपंच कोण व गुलाल कोणाचा याकडेच लागून राहिले आहे. 

No comments:

Post a Comment