" मदनदादा " ५० हजार सभासदांशी रेटून खोटे बोलतात: बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार यांचा आरोप - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 25, 2018

" मदनदादा " ५० हजार सभासदांशी रेटून खोटे बोलतात: बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार यांचा आरोप


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा: किसनवीर कारखान्याने सादर केलेला अहवाल-ताळेबंद लबाडीची पूर्ण कुशलता वापरून तयार केला आहे. खेळत्या भांडवलात २१० कोटी रुपयांची तूट आहे. याला जबाबदार कारखान्याचे व्यवस्थापन आहे. गैर-मनमानी कारभारामुळे आज ही वेळ किसनवीर कारखान्यावर आली आहे व शेतकऱ्यांची मोठी देणी थकली आहेत. ६७१ कोटी रुपयांचा बोजा कारखान्यावर आहे. 


राजकीय वजन वापरून मदनदादांनी कारखान्यावरील जप्ती कारवाई थांबवली. दर वर्षी अहवालाच्या मुख पृष्ठावर ऑडीट वर्ग छापणाऱ्या मदनदादांनी या वर्षीचा अहवाल आतील पानावर छापला आहे. आकड्यांचा खेळ करून सभासदांची निव्वळ फसवणूक सुरू आहे. प्रतापगड कारखान्याचा १० कोटींचा तोटा पत्रकातून उडविला आहे. किसनवीर कारखाना कर्जाच्या खाईत लोटला असताना " मदनदादा " सभासदांशी रेटून खोटे बोलू नका. कारखाना डिस्टलरी प्रकल्प पूर्ण आहे. तो बीओटी तत्त्वावर देण्याचा सभासदांचा विरोध असतानाही मदनदादा असला खटाटोप कशासाठी करताय. कारखान्याची खरी वस्तुस्थिती सभासदांनासमोर गुरुवार दि. २७ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडा  असे आवाहन कारखान्याचे सभासद राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी माजी संचालक बाबासाहेब कदम, धमर्राज जगदाळे, तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment