नाव ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, घटनेच्या निषेधार्थ रविवारी कोयनानगर बंदची हाक, - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 29, 2018

नाव ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, घटनेच्या निषेधार्थ रविवारी कोयनानगर बंदची हाक,





सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण:   कोयना विभागातील  नाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी  पोलीस पाटील संतोष विचारे याला ताबडतोब अटक करून जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मागणी  मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका यांचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, याबाबतचे निवेदन तहसीलदार रामहरी भोसले  , उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर  यांना देण्यात आले, यावेळी  मराठा क्रांती मोर्चाचे यशवंतराव जगताप शंकरराव मोहिते, बकाजीराव निकम, राजाभाऊ काळे, माथनेसर,  रवींद्र पाटील, संजय विचारे, नारायण विचारे यांच्यासह समस्त मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते,
 या निवेदनात म्हटले आहे की, कोयना विभागातील नाव गावातील एक अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी गावातीलच   पाटण (रामपूर) येथे येथे राहणाऱ्या संतोष विचारे नमक व्यक्तीकडे राहत होती, अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा  गैरफायदा घेऊन पोलिस पाटील  पदावर  काम करणाऱ्या या नराधमाने या मुलीवर अत्याचार केला,हि समाजामध्ये चीड आणणारी घटना आहे, संबंधित संशयित  आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे, यापूर्वी या व्यक्तीकडून  अशा प्रकारचे महिलांच्या छेडछाडीचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत, या घटनेचा पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत, तरी या नराधमास पाठीशी न घालता ताबडतोब अटक करून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, तसेच सदर अत्याचारग्रस्त कुटुंबास शासनाकडून ताबडतोब मदत देण्यात यावी, व  सदर संशयित आरोपीस पोलीस पाटील पदावरून तात्काळ निलंबित करावे असे म्हटले आहे, निवेदनावर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या  सह्या आहेत ,यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
      तसेच या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नाव गावातील ग्रामस्थांनी पाटण तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मारून आंदोलन केले पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी गावातील पोलीस पाटील संतोष विचारे याला ताब्यात घेऊन  त्याची निपक्षपाती चौकशी करून पोलिसांनी कारवाई करावी व पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी  व  महिलांनी केली,
 या आंदोलनात कोयना विभागातील महिला नाव गावचे  स्थानिक व मुंबईस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
 या आंदोलनास आमदार शंभूराज देसाई व तहसीलदार रामहरी भोसले यांनी भेट देऊन पीडित मुलीला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली,
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नाव ग्रामस्थ  व सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या रविवारी कोयनानगर बंदची हाक देण्यात आली आहे,
सदर घटनेच्या तपासाचे काम सुरू असून संबंधित पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणी चा अहवाल येतात त्यानुसार संशयित आरोपी वर कारवाई केली जाईल असे पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले,

No comments:

Post a Comment