जलसेतूच्या गळतीची बानुगडेंकडून पाहणी - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 29, 2018

जलसेतूच्या गळतीची बानुगडेंकडून पाहणी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी  : चितळी येथील येरळा नदीवर असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या जलसेतुला गळती लागली आहे.  शनिवारी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा सातारा सांगली जिल्हा संपर्क नितीन बानुगडे - पाटील यांनी या ठिकाणी भेट  देऊन संबंधित अधिकार्‍यांना जलसेतू दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या
यावेळी चितळी व  परिसरातील ग्रामस्थांनी टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी की मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे पाटील यांच्याकडे केली .
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल. तसेच आपण केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यांत  येईल असे  आश्वासन पाटील यांनी दिले
पाटबंधारे व  कृष्णा खोरे अभियंतांना ही गळती  तातडीने काढून जलसेतू पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी चितळी गावचे सुपुत्र व शिवसेना तालुकाप्रमुख   अनिल पवार यांनी चितळी व परिसरातील गावांचा टेंभू योजनेत अधिकृत समाविष्ट करून या गावांना शेतीसाठी पाणी द्यावे अशी मागणी केली.
यावेळी चितळी परिसरात असणार्‍या पवार मळा, माहिती मळा, मराठी नगर शेडगेवाडी, मोहिते मळा यासह इतर वाडया वस्तावरील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी  शेती पाण्यासाठी पाटील यांच्याकडे निवेदन दिले.

No comments:

Post a Comment