सातारा इनरव्हील क्लब सातारा कॅम्प शाखेतर्फे गणेशोत्सव विविध उपक्रम - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 26, 2018

सातारा इनरव्हील क्लब सातारा कॅम्प शाखेतर्फे गणेशोत्सव विविध उपक्रम


साताराः येथील इनरव्हील क्लब सातारा कॅम्प शाखेच्यावतीने नुकत्याच संपन्न झालेल्या गणेशोत्सवात विविध सामाजिक व धार्मिक प्रबोधनात्मक उपक्रम साजरे करण्यात आले. या उपक्रमात रोटराक्टय क्लबही मोठया उत्साहाने सहभागी झाला होता. यामध्ये कुपर कॉलनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापुढे सहस्त्र आवर्तन अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणण्यात आले यामध्ये सुमारे 100 हून अधिक महिलांनी 1 हजार 21 वेळा अथर्वशीर्षाची आवर्तने करून गणपतीपुढे उपासना केली.


 रामकृष्ण पाठशाळेच्या सौ. रागिणी दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पठन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सौ. ज्योत्स्ना भोसले, माजी प्रांतपाल गीता मामणीया, संगीता झंवर, अंजली देशपांडे, अपर्णा गांधी, सीमा मुथा, कीर्ती साळुंखे, संगीता नांगरे, ज्योत्स्ना बोधे, दिव्या ठक्कर, कीर्ती राठी, डॉ. मुग्धा महाजन, डॉ. तन्वी महाजन उपस्थित होत्या.प्रसाद व मसालादुध वाटप करून कार्यक्रमांची सांगता झाली.


दरम्यान शहरातील विविध मंडळांपुढे पथनाटय सादर करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्यास विद्यार्थी- विद्यार्थीनीनी सामाजिक विषयाला अनुषंगिक असे पथनाटय यावेळी सादर केली. तसेच मोती चौकातील अनेक मंडळांपुढे हे पथनाटय पाहण्यासाठी हजारो सातारकरांनी गर्दी केली होती. शहरातील शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळ, सदरबझार येथील भारतामाता मंडळ, याठिकाणीही सामाजिक संदेश देणारी पथनाटये सादर केली. शहरातील महागणपती सम्राट मंडळ, पंचमुखी गणेश मंडळ, मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ येथे महिलांवरील अत्याचार, हुंडयामुळे होणारे बळी, स्त्री व तरूणींची छेडछाड, बलात्कार याविषयावर मुलांनी पथनाटये सादर केले.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नुतन पोलीस अधिक्षक पंकज देशमुख उपस्थित होते यांनीही या उपक्रमाचे कोतूक करून क्लबच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सौ. सुनंदा शहा, सौ.सविता हेडे, सौ. अंजली देशपांडे, अ‍ॅड. कीर्ती साळुंखे, सचिव सौ. रेणु येळगावकर आदी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment