अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करा, दलित महिला विकास मंडळाची मागणी - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 26, 2018

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करा, दलित महिला विकास मंडळाची मागणी


पाटण- कोयना विभागातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार रणार्‍या नराधमास तात्काळ अटक करावी अशी मागणी दलित महिला विकास मंडळाच्या पाटण तालुका अध्यक्षा अश्विनी सपकाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस प्रमुख सातारा, आमदार शंभूराज देसाई, सामाजिक कार्यकर्त्यां अ़ॅड. वर्षा देशपांडे,उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार पाटण, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोयनानगर यांना देण्यात आल्या आहेत, या निवेदनात म्हटले आहे की ,कोयना  विभागातील  दुर्गम व डोंगराळ गावात राहणाऱ्या अल्पवयीन  मुलीवर  लैंगिक अत्याचार झाल्याचे  प्रसारमाध्यमाद्वारे समजत  आहे.


सदर पीडित बालिकेवर कराड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटना सर्वांच्या मनाला अतिशय वेदना देणारी आहे आणि भविष्यातील धोक्याची घंटा आहे, या निवेदनाद्वारे आम्ही समस्त विभागातील माता-भगिनी आपणास विनंती करत आहे कि या प्रकरणाची सखोल चौकशी करून हे निंदनीय कृत्य करणार्‍या नराधमास कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता येत्या दोन दिवसांत अटक करावी, अन्यथा आम्ही समस्त  माता-भगिनी शनिवार दिनांक 29 -10 -2018 पासून त्या नराधमास अटक होईपर्यंत पाटण तसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहोत तरी याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संशयित नराधमास तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे, या निवेदनावर कोयना विभागातील महिला, युवती यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment