मलकापूर नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, आरक्षण सोडतीत कही खुशी कही गम, एकून 9 प्रभागातील 19 सदस्यांच्या आरक्षणाची सोडत - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, October 31, 2018

मलकापूर नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, आरक्षण सोडतीत कही खुशी कही गम, एकून 9 प्रभागातील 19 सदस्यांच्या आरक्षणाची सोडत



तानाजी देशमुख/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मलकापूर : कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेचा बिगुल वाजला असून बुधवार दि.31 रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मलकापूर नगरपरिषद बहुउद्देशीय कार्यालय लक्ष्मीनगर येथे आज पार पडला. यामध्ये दिग्गजांना फटका बसला तर अनेकांना आरक्षण सोडतीच्या लॉटर्‍या लागल्याचे चिञ निर्माण झालेले आहे. एकुन 9 प्रभागांमध्ये 19 सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रांताधिकारी हिम्मत खराडे.मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रभाग निहाय आरक्षण स्थिती पुढील प्रमाणे
प्रभाग क्र 1   सर्वसाधारण (महिला )व सर्वसाधारण पुरुष एक असा एकून 2 सदस्यांचा प्रभाग असेल याची लोकसंख्या 3475 अशी आहे. यामध्ये संगम हॉटेल परिसर,कालिदास मार्केट,नेहरुनगर,रिमांड होम, जि.प.प्राथमिकशाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस नगर, वारणा हॉटेल परिसर,दत्तनगर ,साईनगर,संभाजी नगर , असा सवावेश असेल.
प्रभाग क्र 2 यामध्ये नागरिकाचा मागासप्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण एक  असा एकून 2 सदस्य संख्येचा प्रभाग असेल. या प्रभागाची लोकसंख्या 3010 इतकी असून यामध्ये अजंठा पोल्ट्री फार्म परिसर, मळाईनगर , यशवंतनगर , प्रितिसंगम मंगल कार्यालय , मुल्लावस्ती ,तुळजाईनगर , हॉटेल नवरंग परिसर , अक्षता मंगल कार्यालय,हॉटेल राजतारा परिसर , लक्ष्मी कॉलनी , सरस्वती कॉलनी , ज्ञानदिप कॉलनी या परिसराचा समावेश असेल.
प्रभाग क्र 3 यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण (महिला) असा एकून 2 सदस्य संख्येचा प्रभाग असेल या प्रभागाची लोकसंख्या 3630 इतकी असेल.यामध्ये तवटे मार्केट परिसर , डी.एम.एस. कॉम्पलेक्स परिसर, म्हसोबा मंदिर , गणेश मंगल कार्यालय , कुसुम रेसिडेन्सी, विश्रामनगर , जि.प.प्राथमिकशाळा , अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याचा उत्तरेकडीलभाग, बिरोबामंदिराचे पूर्वेकडीलभाग , गजानन पतसंस्था परिसर, भारती विद्यापीठ परिसर ,यशवंत हौसिंग सोसायटी, आनंदराव चव्हाण हायस्कूल परिसराचा समावेश असेल.
 प्रभाग क्र 4 यामध्ये सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण पुरुष एक असा दोन सदस्य संख्येचा प्रभाग असेल.या प्रभागाची लोकसंख्या 2991 इतकी असुन यामध्ये भोजगावकर कॉम्लेक्स परिसर, मळाई टॉवर परिसर, हौसाई कन्या शाळा परिसर, जयहिंद प्राईड , कराड खरेदी विक्री संघ परिसर, व्यंकटेश प्लाझा , नटराज टॉकीज परिसर, नाकोडा स्टील,लाहोटीनगर, इंदूमतीनगर, शिवाई पतसंस्था , ढेबेवाडी फाटा परिसर , मोरया काँम्लेक्स , कोणार्क पार्क , संगम कॉलनी , पवार मामा बझार परिसर, दत्तमंदिराच्या पूर्वेकडील भागाचा समावेश असेल.
प्रभाग क्र 5  यामध्ये अनुसुचित जाती (खुला) व सर्वसाधारण (महिला) असा दोन सदस्य संख्येचा प्रभाग असेल. या प्रभागाची लोकसंख्या 3193 इतकी असून यामध्ये दत्तमंदिर परिसर, बागल वस्ती परिसर, दत्त शिवम हौसिंग सोसायटी, जयमल्हार कॉलनी , न्यू सर्वोदय सोसायटी , व त्याचा उत्तरेकडीलभाग, आयोध्यानगरी, नूतन मराठी प्राथमिक शाळा परिसर, शिवदर्शन हौसिंग सोसायटी ,बालाजी कॉलणीचा पूर्वेकडील भागाचा समावेश असेल.
प्रभाग क्र 6  यामध्ये नागरिकाचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण (महिला)  असा एकून दोन सदस्य संख्येचा प्रभाग असेल. याप्रभागाची लोकसंख्या 3178 इतकी असेल.यामध्ये बालाजी कॉलनी पस्चिमेकडील भाग, जाधववस्ती, पोळवस्ती, वाघमारेवस्ती, पवारवस्ती, शिंगणवस्ती परिसर, गणेश कॉलनी, शिवपर्वत कॉलणी, अभिनव कॉलनी, तडकवस्ती, त्रिमूर्ती कॉलनी, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, आगाशिवनगर, हनुमान नगर परिसर, महसूल कॉलनी परिसराचा समावेश असेल.
प्रभाग क्र 7  यामध्ये अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण पुरुष एक असा दोन सदस्य संख्येचा प्रभाग असेल. या प्रभागाची लोकसंख्या 3260 इतकी असेल. यामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पस्चिमेकडील झोपडपट्टी व परिसर, दांगटवस्ती , कोल्हाटीवस्ती , मलकापूर नगरपरिषद जलशुध्दीकरण केंद्र, व त्याचे दक्षिणेकडील झोपडपट्टी, आझाद कॉलनी , जिल्हापरिषद हौसिंग सोसायटी, लोकमान्य कॉलनी , ढेबेवाडी रस्त्याचे लगतचा भाग,माने वखारीपासून उत्तरेकडे गेलेल्या रस्त्यापर्यंत, सर्वोदय बॅकबर्ड क्लास सोसायटी च्या भागाचा समावेश असेल.
प्रभाग क्र 8 यामध्ये नागरिकाचा मागासप्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण पुरुष असा दोन सदस्यांचा प्रभाग असेल.या प्रभागाची लोकसंख्या 3610 इतकी आहे. याभागामध्ये इंद्रप्रस्थ कॉलनी मधील रस्ता क्र 2 चे दक्षिणेकडील आगाशिवा डोंगरापर्यंतचा भाग, माने वखारीपासून दक्षिणेकडे गेलेल्या रस्त्याचे पूर्वेकडीलभाग, वृंदावन कॉलनी , कृष्णा हॉस्पिटल परिसर, विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, कोयना औद्योगिक वसाहत परिसर, शिवदर्शन हौसिंग सोसायटी परिसर, व्यंकटेशनगर, खंडोबानगर , साई शिक्षक कॉलनी , थोरातमळा, या भागाचा समावेश असेल.
प्रभाग क्र 9 यामध्ये नागरिकाचा मागासप्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण पुरुष असा एकून 3 सदस्य संख्येचा प्रभाग असेल. या प्रभागाची लोकसंख्या 5328 इतकी असेल. या भागामध्ये  लक्ष्मीनगर (गावठाण) संपूर्ण परिसर , अनुराज आपार्टमेंट परिसर, अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याचे दक्षिणेकडील व मुख्य रस्त्यालगतचाभाग, औदूंबर कॉलनी, हिंगसे किराणा स्टोअर्स, डॉ.बने यांचे घरालगतचा परिसर, शिवाजीनगर मुख्य रस्त्याचे पूर्वेकडील व पस्चिमेकडील संपूर्ण भाग, जगदाळे मळा व परिसर , स्मशानभूमी परिसर पर्यंतच्या भागाचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment