माजी सभापती सोमनाथ माळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, November 4, 2018

माजी सभापती सोमनाथ माळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी : खोटे दस्तऐवज व खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक करून आर्थिक लाभासाठी मालमत्ता हडपल्याप्रकरणी वडूज मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ काशिनाथ माळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने मायणी परिसरात खळबळ उडाली आहे
याबाबत पोलिसांकडून व तक्रारदार अनिल सुदाम माळी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी मायोनीत न.भू.क्र 774 क्षेत्र 73.6 चौ.की ही मिळकत कै.शंकर विठू माळी यांच्या नावे होती दिनांक 25 10 1999 रोजी कै. शंकर माळी मयत झाले नंतर त्यांचे नातू सोमनाथ काशिनाथ माळी यांनी तारीख 8 2 2010 रोजी परीक्षण भूमापक नगर भूमापक अधिकारी मायणी यांना अर्ज करून मयत शंकर माळी यांना कै. काशीनाथ शंकर माळी हे एकमेव वारस असून तेही दिनांक 30 10 2000 रोजी मयत असल्याने त्यांचे वारस पत्नी मालन काशिनाथ माळी मुले सोमनाथ व प्रमोद मुली शैलेजा व मनीषा हे वारस सिटी सर्वे नंबर 774 वारस नोंद करावी असा अर्ज करून दिनांक 17 1 2018 रोजी कार्यकारी दांडाधिकारी यांच्या समोर केलेला प्रतिज्ञालेख जोडलेला आहे वास्तविक कै शंकर माळी यांची मुले कै काशिनाथ पांडुरंग उत्तम शिवाजी तानाजी ही मुले अनुसया चंद्रभागा सुलोचना यशोदा हे वारस आहेत हे कै काशिनाथ माळी यांनी गाव कामगार तलाठी यांनादिनांक 16 6 2003 रोजी दिलेल्या अर्जावरुन स्पष्ट होत आहे असे असताना सोमनाथ माळी यांनी मालमत्ता हडपण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक केली याबाबत तक्रारदार अनिल माळी यांनी जिल्हाधिकारी सातारा अधीक्षक भूमी अभिलेख सातारा अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता त्यानुसार उपाधिक्षक  भुमीअभिलेख वडूज यांनी चौकशी करून सोमनाथ माळी यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची सूचना केली वास्तविक कै शंकर माळी यांना कै काशिनाथ माळी यांच्यासह अनेक वारसदार असताना स्वतः आपणच एकमेव वारसदार आहोत असे खोटे दस्तऐवज खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे

No comments:

Post a Comment