सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण: पाटण तालुक्यात बिबट्याचा हैदोस सुरू असतानाच मौजे शिरळ येथे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांबर गौंड नावाच्या शेतात जनावरे चारत असतानाच लक्ष्मीबाई धोंडीराम मोहिते वय 57 वर्षे, राहणार शिरळ या महिलेवर रानगव्याने हल्ला करुन जखमी केले आहे, सदर महिलेवर पाटण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालय कराड येथे पाठविणे आले, सदर रानगवा पिसाळलेला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले त्यामुळे शिरळ गाव व परिसरातील नागरिकाच्यात मन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, संध्याकाळी उशिरापर्यंत पंचनाम्यासाठी कोणी ही वनअधिकारी घटनास्थळी हजर राहिले नव्हते,
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पाटण वनविभागाचे अधिकारी विलास काळे यांनी कृष्णा रुग्णालय कराड येथे जाऊन जखमी महिलेची विचारपूस करून पंचनामा केला,
No comments:
Post a Comment