सांस्कृतिक परंपरा जपणे गरजेचे: पाटणकर - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 1, 2018

सांस्कृतिक परंपरा जपणे गरजेचे: पाटणकर



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण : या देशाला आणि राज्याला धार्मिक, आद्यात्मिक आणि एकात्मिक परंपरा आहे. ही परंपरा जोपासून गणेश उत्सव सारखा एकात्मिक उत्सव आज देशभरातच नव्हेतर जगभरात साजरा केला जातो. अशा उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन समाज प्रबोध्दात्मक कार्यक्रमाच्या स्पर्धा  राबवून केलेले कार्य हे सामाजिक कार्यच आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज 24 बाय 7 फाउंडेशनच्यावतीने आयोजित गौरी - गणपती देखावा स्पर्धेच्या बक्षिस समारंभ प्रसंगी केले.
यावेळी तहसीलदार रामहरी भोसले, समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शुंभागी घाडगे, डी. के. सामाजिक ग्रुपचे अध्यक्ष दादासाहेब खांडके, श्रीमती सुहासिनी पिसाळ, फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष नितीन पिसाळ, सिनेअभिनेते संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पाटणकर यांच्या हस्ते शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्कृष्ठ समाजप्रबोधन देखावा साकारणार्‍या समाज सेवा संघ मोरेगल्ली या मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. व्दितीय  पारितोषिक प्रताप सेवा मंडळ झेंडा चौक, तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक शिवलिंग ग्रुप श्रीमंत दादासाहेब पाटणकर नगर यांना देण्यात आले. तर उत्तेजनार्थ रणजित सेवा मंडळ आणि शिवाजी उदय मंडळ यांना देण्यात आले.
घरगुती गौरी - गणपती सजावट देखाव्यामधे सीमा सतीश पाटील, बकुल अजितसिंह पाटणकर यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. सुनिता सुनील मोरे यांना व्दितीय, स्वाती राजेंद्र देसाई यांना तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.  तर उत्तेजनार्थ सौ. भोज आणि भाग्यश्री नरेंद्र कुंभार यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी  पाटण तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसह  दैनिक सत्य सह्याद्रीचे पाटण तालुका प्रतिनिधी संजय कांबळे,, यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment